हजारो क्विंटल तूर पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:17 IST2017-08-05T01:17:02+5:302017-08-05T01:17:09+5:30
आदिवासी विकास विभागाच्या रेनकोट आणि स्वेटर खरेदीच्या गोंधळानंतर तूरडाळ खरेदी प्रकरण चर्चेत आले असून, हजारो क्ंिवटल तूर चढ्या दराने खरेदी केल्यानंतर आता तुरीचे उतरलेले भाव आणि सातत्याने हजारो क्ंिवटल तूर पावसात भिजून खराब होण्याच्या मार्गावर आहे. ही तूर आता भरडाईला दिली तरीही आदिवासी विकास महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे.

हजारो क्विंटल तूर पडून
नाशिक : आदिवासी विकास विभागाच्या रेनकोट आणि स्वेटर खरेदीच्या गोंधळानंतर तूरडाळ खरेदी प्रकरण चर्चेत आले असून, हजारो क्ंिवटल तूर चढ्या दराने खरेदी केल्यानंतर आता तुरीचे उतरलेले भाव आणि सातत्याने हजारो क्ंिवटल तूर पावसात भिजून खराब होण्याच्या मार्गावर आहे. ही तूर आता भरडाईला दिली तरीही आदिवासी विकास महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे.
त्यामुळे ही तूर आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा किंवा वसतिगृहांना पुरविण्यात यावी किंवा तत्काळ विक्री करण्यात यावी, यासाठी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडे आदिवासी विकास महामंडळाचे संचालक माजी आमदार धनराज महाले व दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी एका पत्रान्वये मागणी केली आहे. आदिवासी विकास महामंडळाने सन २०१५-१६ या वर्षात नंदुरबार प्रकल्पामार्फत १०१० क्विंटल, धारणी प्रकल्पांतर्गत ७०१५ क्ंिवटल, यवतमाळ ७५०० क्विंटल व नाशिक ३३ क्विंटल अशी एकूण १५५५८ क्विंटल तूर धान्य एकाधिकार खरेदी योजनेंतर्गत खरेदी केले. तसेच सन २०१६-१७ अंतर्गत नंदुरबार प्रकल्पांतर्गत २६० क्ंिवटल, धारणी प्रकल्पांतर्गत ३२७८.३२ क्विंटल, यवतमाळ प्रकल्पांतर्गत २१४४.७४ क्ंिवटल अशी एकूण ५८८३.०६ क्विंटल तूर खरेदी केली आहे. दोन्ही वर्षात मिळून २१ हजार २४१.०६ क्विंटल तूर शिल्लक असून, तुरीचे भाव गडगडले आहेत. आता ही तूर पावसात भिजून आदिवासी विकास महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे. भरडाईला देऊनही महामंडळाचे नुकसान होणार असल्याचा दावा आजी-माजी आमदारांनी केला आहे. एक तर ही तूर खुल्या बाजारात तत्काळ विक्री करावी, अथवा आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी तरी वापरायला द्यावी, अशी मागणी आमदार नरहरी झिरवाळ व आदिवासी विकास महामंडळाचे संचालक माजी आमदार धनराज महाले यांनी केली आहे. आधीच रेनकोट आणि स्वेटर खरेदीमुळे चर्चेत असलेले आदिवासी विकास आयुक्तालय आता तूर खरेदीवरून चर्चेत आले आहे.