जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 22:50 IST2022-03-29T22:49:49+5:302022-03-29T22:50:29+5:30
पिंपळगाव बसवंत : शहरातील जुन्या महामार्गाचे क्राँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने अंदाज न आल्याने जेसीबीच्या धक्क्याने जलवाहिनीला भगदाड पडले. यामुळे पाण्याचे फवारे उडून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला.

जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया
पिंपळगाव बसवंत : शहरातील जुन्या महामार्गाचे क्राँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने अंदाज न आल्याने जेसीबीच्या धक्क्याने जलवाहिनीला भगदाड पडले. यामुळे पाण्याचे फवारे उडून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला.
दोन तासानंतर जलवाहिनीची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. पिंपळगाव शहरातील बसडेपो ते निफाड फाटा या जुन्या महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे.
जेसीबी मशीनच्या सहाय्याने रस्त्याच्या कडेला खोदकाम सुरू होते. अंदाज न आल्याने उंबरखेड रस्त्याहून अग्निशामक दलाच्या प्रांगणात
जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीला भलेमोठे भगदाड पडले. त्यामुळे पोलीस वसाहतीसमोर पाण्याचे जोरदार फवारे उडू लागले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम सुरू केले. तोपर्यंत ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली.