विंचुरी दळवीला शेततळ्यातील हजारो मासे मृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 14:59 IST2019-10-07T14:59:07+5:302019-10-07T14:59:30+5:30
विंचुरी दळवी (सिन्नर) : येथील सोमनाथ नामदेव दळवी यांच्या शेततळ्यातील अनेक मासे मृत झाल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. ऐन उत्पन्न मिळण्याच्या काळात अचानक माशांचा मृत्यू झाल्याने काय झाले असावे, याची चर्चा आहे.

विंचुरी दळवीला शेततळ्यातील हजारो मासे मृत
विंचुरी दळवी (सिन्नर) : येथील सोमनाथ नामदेव दळवी यांच्या शेततळ्यातील अनेक मासे मृत झाल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. ऐन उत्पन्न मिळण्याच्या काळात अचानक माशांचा मृत्यू झाल्याने काय झाले असावे, याची चर्चा आहे. दळवी यांची खंडेराव टेकडी परिसरामध्ये शेती आहे. त्यांनी अडीच एकराचे शेततळे बनवलेले आहे. पाच महिन्यांपूर्वी या शेततळ्यात माशांचे बीज टाकले होते. त्यासाठी मोठा खर्च दळवी यांनी केला आहे. रविवारी दळवी शेततळ्यावर गेल्यावर त्यांना धक्काच बसला. शेततळ्यातील सुमारे दीड लाख मासे त्यांना पाण्यावर तरंगताना दिसले. मासे मृत झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.