शहरात तेरा हजारांनी वाढले मूर्ती संकलन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 01:00 AM2019-09-14T01:00:57+5:302019-09-14T01:01:23+5:30

शहरात पर्यावरणस्नेही गणेश विसर्जन करण्यास यंदाही प्रतिसाद मिळाला असून, यंदा १ लाख २९ हजार ९२३ मूर्तींचे दान स्वीकारण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत १३ हजारांनी मूर्ती संकलन वाढले आहे.

 Thousands in the city have increased the collection of idols! | शहरात तेरा हजारांनी वाढले मूर्ती संकलन !

शहरात तेरा हजारांनी वाढले मूर्ती संकलन !

Next

नाशिक : शहरात पर्यावरणस्नेही गणेश विसर्जन करण्यास यंदाही प्रतिसाद मिळाला असून, यंदा १ लाख २९ हजार ९२३ मूर्तींचे दान स्वीकारण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत १३ हजारांनी मूर्ती संकलन वाढले आहे. याशिवाय १०८ टन निर्माल्यदेखील संकलित करण्यात आले असून, त्या माध्यमातून गोदावरीसह अन्य नद्यांचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात टळले आहे.
शहरातील जीवनदायिनी गोदावरी नदी तसेच नासर्डी आणि वालदेवी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नदीपत्रातील प्रदूषणाच्या विरोधात पर्यारणप्रेमी संघर्ष करीत असून, अनेकांनी त्यासाठी उच्च न्यायालयात दाददेखील मागितली आहे. महापालिका हद्दीत तरी मूर्ती आणि निर्माल्य टाकून विसर्जन होऊ नये यासाठी महापालिका १९९५-९६ पासून महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीला सहकार्य करीत आहेत. त्यानंतर आता महापालिका मुख्यत्वे करून मोहीम राबवित असून, अन्य अनेक सेवाभावी संस्था त्यासाठी महापालिकेला सहकार्य करीत असतात.
यंदाही महापालिकेने २४ नैसर्गिक विसर्जनस्थळी तसेच २८ कृत्रिम हौदांच्या ठिकाणी विसर्जित मूर्ती दान स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक सेवाभावी संस्थांनी त्यासाठी सहकार्य करून नागरिकांनी प्रबोधन केले होते. महापाालिकेच्या सहाही विभागांत एकूण ५४ ठिकाणी मूर्ती संकलन करण्यात आले. यंदा एकूण १ लाख २९ हजार ९२३ गणेशमूर्ती संकलित झाल्या आहेत. यात नाशिक पूर्वमधून ६ हजार ९५२, नाशिक पश्चिममधून १३ हजार ३२१ मधून, सातपूरमधून २८ हजार ९४६, तर नाशिकरोड १७ हजार ६६५ याप्रमाणे मूर्ती संकलन झाले आहे.
गेल्यावर्षी १ लाख १६ हजार ८९६ गणेशमूर्ती शहरातून संकलित झाल्या होत्या, त्या तुलनेत यंदा १३ हजार २७ मूर्ती संकलित करण्यात आल्या आहेत.
१०८ टन निर्माल्य
यंदा १०८ टन निर्माल्य संकलित करण्यात आले. नाशिक पूर्वमधून ९.०९५, नाशिक पश्चिम ११.१२, पंचवटीत २८.५९५ टन, सिडकोत २१ टन, सातपूर येथून २४.१६ टन, तर नाशिकरोड येथील १४.०६५ टन याप्रमाणे १०८ मेट्रिक टन निर्माल्य संकलित झाले आहे.

Web Title:  Thousands in the city have increased the collection of idols!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.