शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

एक हजार मे. टन कांदा साठवणूक प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 02:50 IST

नायगाव : जिल्ह्यात कांदा उत्पादनात अग्रेसर असलेला तालुका म्हणून सिन्नरची ओळख आहे. याच तालुक्यातील नायगाव खोऱ्यात महाएफपीसी व नाफेड ...

ठळक मुद्देनायगाव खोऱ्यात उभारणी : शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

नायगाव : जिल्ह्यात कांदा उत्पादनात अग्रेसर असलेला तालुका म्हणून सिन्नरची ओळख आहे. याच तालुक्यातील नायगाव खोऱ्यात महाएफपीसी व नाफेड यांच्यामार्फत महाओनियन प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या वतीने नायगाव-सिन्नर रस्त्यावर एक हजार मेट्रिक टन क्षमता असलेल्या कांदा साठवणूक गृह, प्रतवारी विभाग, वजनकाटा केंद्राची उभारणी झालेला देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे. पायाभूत सुविधांनी साकारलेल्या प्रकल्पात कांद्याची प्रतवारी व योग्य दरासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प वरदान ठरणार असल्याने उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प शुभ वर्तमान ठरत आहे.एक हजार मेट्रिक टन कांदा साठवणूक क्षमतेच्या या प्रकल्पाचे ऑनलाइन लोकार्पण नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा साठवणूक सुविधांमुळे तसेच चांगल्या प्रतवारी आणि दर्जेदार कांदा पिकाला आंतरराज्य बाजारपेठेत व्यापाराची संधी व सुविधा उपलब्ध होणार आहेत. 

१ हजार मेट्रिक टन कांदा साठवणूक करणाऱ्या गोदा-दारणा शेतकरी उत्पादक संस्थेला नाफेडकरिता कांदा खरेदी करण्याची मुभा असल्यामुळे या ठिकाणी परिसरातील शेकडो जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. कांदाचाळी कमी क्षेमतेच्या असल्यामुळे हा माल तेथून नाफेडच्या गुदामाला नेण्यासाठी वाहतूक खर्च होतो. त्यामुळे नाफेडच्या गुदामामध्ये गेल्यावर प्रतवारी केली जाते. त्यामुळे हा प्रकल्प जवळचा ठरणार आहे.कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी आजवर बाजार समिती हा एकमेव पर्याय उपलब्ध होता. नाफेडच्या या साठवणूक केंद्रात कांदा खरेदी करण्यात येणार असल्यामुळे व्यापाऱ्यांना खरेदी करताना मनमानी धोरण बाजूला ठेवून स्पर्धात्मक चढाओढीने कांदा खरेदी करावी लागेल.जिल्ह्यातील या महाकाय प्रकल्पामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी