शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

‘त्या’ हौशी रंगकर्मींना नाट्य परिषद विचारणार जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 1:19 AM

नाशिकमधील ५८ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा पार पडली असून, या स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही हौशी रंगकर्मींनी आणि नाट्य संस्थांनी या निकालावर आक्षेप घेतला.

नाशिक : नाशिकमधील ५८ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा पार पडली असून, या स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही हौशी रंगकर्मींनी आणि नाट्य संस्थांनी या निकालावर आक्षेप घेतला. तसेच अखिल भारतीय नाट्य परिषद नाशिक शाखेवर निकालात ढवळाढवळ करीत वशिलेबाजी केल्याचा आरोप केला होता. सदर आरोप नाट्य परिषदेने फेटाळला असून, तो चुकीचा आणि बिनबुडाचा असल्याचा म्हटले आहे. तसेच नाट्य परिषदेचे सभासद असलेल्या त्या रंगकर्मींना याबाबत जाब विचारून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.  अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी यासंबंधी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, ‘त्या’ नाट्यकर्मींनी नाट्य परिषदेवर केलेले आरोप ऐकून आम्ही व्यथित झालो. त्यांनी यासंबंधी आरोप करण्यापूर्वी आमच्या समवेत चर्चा करायला हवी होती. तसेच त्या रंगकर्मींनी परीक्षकांवर केलेले आरोपही चुकीचे आहेत. कारण परीक्षक हे शासनाच्या परिपत्रकानुसार नेमण्यात आलेले असतात. त्यांच्या समवेत सर्वांची ओळख असू शकते; परंतु त्यांनी दिलेला निकाल हा निष्पक्षपाती असतो. त्यावर आक्षेप घेणे चुकीचे आहे. यामुळे नाट्य स्पर्धांमधील वातावरण गढूळ होऊ शकते. स्पर्धांच्या उद्घाटनाला नाट्य परिषदेच्या स्थानिक शाखेचे अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांना बोलविण्याबाबत शासन परिपत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे आम्ही तेथे उपस्थित होतो, असेही प्रा. कदम यांनी स्पष्ट केले. यावेळी कार्यवाहक सुनील ढगे, विनोद राठोड, लक्ष्मी गाढेकर, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक