सटाण्यात चंदनाच्या झाडांची चोरी
By Admin | Updated: July 4, 2017 23:40 IST2017-07-04T23:15:55+5:302017-07-04T23:40:34+5:30
सटाणा : चंदन तस्करांनी आता ताहाराबादपाठोपाठ सटाणा शहराकडे मोर्चा वळवला आहे.

सटाण्यात चंदनाच्या झाडांची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : चंदन तस्करांनी आता ताहाराबादपाठोपाठ सटाणा शहराकडे मोर्चा वळवला आहे. शहरातील चौगाव रोड परिसरातील माधवनगरमध्ये सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या चंदनाच्या झाडांची कत्तल करून चोरून नेल्याचा प्रकार मंगळवारी (दि. ४) सकाळी उघडकीस आला.
शहरातील चौगाव रोड परिसरातील माधवनगर येथे राहणाऱ्या ज. ल. पाटील यांच्या बंगल्याजवळ चंदनाच्या झाडांची लागवड केलेली होती. सुमारे बावीस वर्षांपूर्वी लावलेल्या चंदनाच्या दोन मोठ्या झाडांची अज्ञात चोरट्यांनी रात्री अंधाराचा फायदा घेऊन कत्तल केली. त्यानंतर त्याची लाकडे कापून ते चोरून नेले. हा प्रकार सेवानिवृत्त शिक्षण ज. ल. पाटील यांना आज सकाळी लक्षात आला. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.