ठाणगाव येथे साडेचारशे हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 11:37 PM2019-11-09T23:37:57+5:302019-11-10T00:51:27+5:30

येवला तालुक्यातील ठाणगाव परिसरात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने शेतात उभी असलेली सर्वच पिके पाण्यात सडली आहेत. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू असून, तीनशे बहात्तर बिगर विमाधारक व चौदा विमाधारक खातेदारांच्या सुमारे साडेचारशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती तलाठी अतुल थूल व कृषी अधिकारी धनंजय सोनावणे यांनी दिली.

Thirty-five hundred hectare area of Panchamanam is completed at Thangaon | ठाणगाव येथे साडेचारशे हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

ठाणगाव येथे साडेचारशे हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

Next

पाटोदा : येवला तालुक्यातील ठाणगाव परिसरात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने शेतात उभी असलेली सर्वच पिके पाण्यात सडली आहेत. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू असून, तीनशे बहात्तर बिगर विमाधारक व चौदा विमाधारक खातेदारांच्या सुमारे साडेचारशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती तलाठी अतुल थूल व कृषी अधिकारी धनंजय सोनावणे यांनी दिली.
ठाणगाव येथे विविध पिकांचे पंचनामे सुरू असून, आजपर्यंत मका पिकाचे सर्वाधिक क्षेत्र बाधित आढळले. पावसाने उघडीप दिली असली तरी मका आजही गुडघाभर पाण्यात तरंगत आहे. मका बिट्ट्या व चारा साधल्याने शेतकऱ्यांपुढे पुढील काळात पशुधनाच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या दोन दिवसांत ज्या शेतकऱ्यांना आपल्या पिकांच्या पंचनाम्याविषयी समस्या असतील त्यांनी कृषी व महसूल विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
द्राक्षाचे नुकसान
द्राक्ष उत्पादक शेतकºयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. अनेक द्राक्ष क्षेत्रात पाणी साचल्याने बागेतील मुख्य मालकाडीला बाळी फुटल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. तसेच कोवळ्या घडांची कुज दिसून आली आहे. सोयाबीन, बाजरी पिकांचेदेखील नुकसान झाले आहे.

Web Title: Thirty-five hundred hectare area of Panchamanam is completed at Thangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.