शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या तेराशे जागा रिक्त : शिक्षणाचा हक्क मिळणार कसा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 16:39 IST

शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू झाल्यानंतर सुमारे जवळपास चार महिने प्रवेशप्रक्रिया चालवून चार प्रवेशफेºया घेऊनही जिल्हा भरातील सुमारे तेराशे विद्यार्थी आरटीई प्रवेशापासून वंचित राहिले आहे.

ठळक मुद्देशिक्षण हक्कापासून तेराशे विद्यार्थी वंचीत जागा रिक्त असूनही प्रवेश नाहीक्लिष्ट प्रवेश प्रक्रियेचा फटका

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू झाल्यानंतर सुमारे जवळपास चार महिने प्रवेशप्रक्रिया चालवून चार प्रवेशफेऱ्या घेऊनही जिल्हा भरातील सुमारे तेराशे विद्यार्थी आरटीई प्रवेशापासून वंचित राहिले आहे. शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत मागास व आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव २५ टक्के जागा राखीव आहेत. मात्र किचकट प्रवेशप्रक्रिया आणि कायद्यातील पळवाटांचा वापर करून आरक्षणाचा लाभ घेणाºयांमुळे जिल्हाभरातील तेराशे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळू शकलेला नाही. तब्बल चार महिने प्रवेशप्रक्रिया चालूनही १२९९ विद्यार्थ्यांना जागा रिक्त असूनहीप्रवेश मिळणार नसतील तर शिक्षणाचा हक्क मिळणार कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरटीईअंतर्गत आर्थिक दुर्बल व मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिकृत सूचना शिक्षण विभागाने अद्याप जारी केली नसली तरी याप्रक्रियेतील चारफेऱ्या पूर्ण झाल्यानंतर प्रवेशप्रक्रियेतील सर्व कार्यवाही थांबविण्यात आली आहे. दरवर्षी जुलैच्या अखेपर्यंत शेवटची लॉटरी निघून प्रवेशप्रक्रिया जवळपास पूर्ण होते. परंतु, यावर्षी सप्टेंबर संपेपर्यंत प्रवेशाचा घोळ सुरूच असल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये उपलब्ध ५ हजार ७३५ जागांपैकी १ हजार २९९ जागा रिक्त आहे. विशेष म्हणजे चौथ्या फेरीपूर्वी ही संख्या दीड हजारांहून अधिक होती. याविषयी पालकांकडून तक्रारी प्राप्त झाल्याने शिक्षण विभागाने चौथी फेरी घेतली. या फेरीत सुमारे दोनशे ते अडीचशे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले असले तरी अद्यापही १,२९९ जागा रिक्त असून, या संदर्भात कोणतीही सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे उर्वरित जागांवर प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार की नाही याविषयी पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकRight To Educationशिक्षण हक्क कायदाStudentविद्यार्थीSchoolशाळा