वावीत दीड लाखांच्या मालाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:13 IST2019-07-03T23:12:33+5:302019-07-03T23:13:10+5:30

वावी : सिन्नर तालुक्यातील वावी येथे बसस्थानक परिसरातील किराणा दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी सुमारे रोख बारा हजार रुपयांसह दीड लाख रुपयांचा माल चोरून नेला.

Thirteen lakhs of goods stolen | वावीत दीड लाखांच्या मालाची चोरी

सिन्नर तालुक्यातील वावी येथील मुख्य बाजारपेठेतील किराणा दुकानाचे चोरट्यांनी वाकवलेले शटर.

ठळक मुद्देमुख्य बाजारपेठेतील किराणा दुकान फोडल्याने दहशत निर्माण झाली आहे.

वावी : सिन्नर तालुक्यातील वावी येथे बसस्थानक परिसरातील किराणा दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी सुमारे रोख बारा हजार रुपयांसह दीड लाख रुपयांचा माल चोरून नेला.
मुख्य बाजारपेठेतील किराणा दुकान फोडल्याने दहशत निर्माण झाली आहे. चोरट्यांनी किराणा दुकानातून बारा हजारांची रोख रक्कम व सुमारे १ लाख ४० हजार रुपये किमतीचा किराणा माल चोरट्यांनी चोरून नेला. यात साखर, शेंगदाणेचा कट्टा, साबण व तेलाचे बॉक्स, बिस्किटांचे बॉक्स, खारीक-खोबरे, काजू-बदाम असा नगदी मालाचा समावेश आहे. चोरट्यांनी माल वाहून नेण्यासाठी चारचाकी वाहनाचा वापर झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुख्य बाजारपेठेत योगेश पाचपाटील यांचे भोलेहर किराणा अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स आहे. बुधवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास काही ग्रामस्थांना दुकानाचे शटर तोडलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. अज्ञात चोरट्यांनी लोखंडी रॉडच्या साह्याने दुकानाचे पूर्वेकडील शटर उचकवून आता प्रवेश केला. सामानाची उचक-पाचक करून गल्ल्यात असलेली चिल्लरसह बारा हजार रुपये व किराणा माल चोरून नेला.
दुकानात विक्र ीसाठी ठेवलेले २५ हजार रु पयांचे मोबाइल फोनदेखील चोरून नेले. याच दुकानासमोर असणाऱ्या प्रकाश कासार यांच्या संजीवनी इलेक्ट्रिकल या दुकानाचे शटर तोडण्याचाही चोरट्यांनी प्रयत्न केला. घटनेची माहिती दिल्यानंतर हवालदार संदीप शिंदे, सुधाकर चव्हाणके, नितीन जगताप यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

Web Title: Thirteen lakhs of goods stolen