सलग तिसऱ्या वर्षी रस्त्याची लोकवर्गणीतून मलमपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:11 IST2021-06-20T04:11:44+5:302021-06-20T04:11:44+5:30
मानोरी बु. ते देवगाव फाटा या पाच किलोमीटर अंतर रस्त्यांची पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दुरवस्था होत असते. खड्ड्यात रस्ते की ...

सलग तिसऱ्या वर्षी रस्त्याची लोकवर्गणीतून मलमपट्टी
मानोरी बु. ते देवगाव फाटा या पाच किलोमीटर अंतर रस्त्यांची पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दुरवस्था होत असते. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी ओळख या रस्त्याची मागील आठ ते दहा वर्षांपासून झाली आहे. रस्त्याची दुर्दशा झाल्याने पावसाळ्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना या मार्गक्रमण करणे अवघड बनले होते. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने नेहमी वाहनांचा खोळंबा होत असल्याचे दिसून येत होते. मानोरी बुद्रुक, मानोरी खुर्द, हनुमाननगर, वाकद, खडकीमाळ आदी परिसरातील शेतकऱ्यांना शिर्डी-लासलगाव महामार्गापर्यंत जाण्यासाठी हा पर्यायी रस्ता आहे. हा मुख्य रस्ता असल्याने पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था शेतशिवारातील मातीच्या रस्त्यासारखी होत असते. त्यामुळे हनुमाननगर येथील सर्व शेतकरी वर्गाने एकत्रित येत हा रस्ता दुरुस्त केला आहे. मानोरी बु. ते लासलगाव महामार्गावर असलेल्या देवगाव फाटा या पाच किलोमीटर रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
फोटो - १९ मानोरी बुद्रूक रोड
मानोरी बु ते देवगाव फाटा रस्त्यावर लोकवर्गणीतून मुरूम टाकून बुजविलेले खड्डे.
===Photopath===
190621\19nsk_39_19062021_13.jpg
===Caption===
फोटो - १९ मानोरी बुद्रूक रोड मानोरी बु ते देवगाव फाटा रस्त्यावर लोकवर्गणीतून मुरूम टाकून बुजविलेले खड्डे.