बोराळे गावावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:22 IST2020-07-13T21:35:34+5:302020-07-14T02:22:39+5:30
नांदगाव : विकासाचा आदर्श समोर असला तर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘नवदृष्टी’ साकार करता येते. बोराळे गावातले सीसीटीव्ही कॅमेरे आज गावची दृष्टी बनले आहे. त्यांच्या साहाय्याने गावातला कानाकोपरा २४ तास नजरेखाली आला आहे. जणू गावालाच डोळे आले आहे.

बोराळे गावावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर
नांदगाव : विकासाचा आदर्श समोर असला तर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘नवदृष्टी’ साकार करता येते. बोराळे गावातले सीसीटीव्ही कॅमेरे आज गावची दृष्टी बनले आहे. त्यांच्या साहाय्याने गावातला कानाकोपरा २४ तास नजरेखाली आला आहे. जणू गावालाच डोळे आले आहे. यापुढे कोणतेही गैरकृत्य लपणार नाही व चांगले काम दिसल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात सरपंच अश्विनी पवार व ग्रामसेवक मिलिंद सोनवणे यांनी आनंद व्यक्त केला. एरव्ही गावात निवडणुका आल्या की राजकीत स्पर्धा सुरू होते. आरोपांच्या फैरी झाडल्या जातात. मात्र ती संपली की, गटातटाचे राजकारण बाजूला सारून गावाचा विकास कसा करायचा, याचा आदर्श बोराळे ग्रामपंचायतीने आजपर्यंत केलेल्या विकासकामांच्या माध्यमातून दाखवून दिला आहे. जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेली नांदगाव तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायत विकासात्मक धोरणे राबवत विकासाकडे पाउल टाकताना दिसत आहे.
आता बोराळे ग्रामपंचायतीने २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या चौदाव्या वित्त आयोगाचा योग्य वापर करत गावात सीसीटीव्ही बसवले. एकूण २९ ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गावातील प्रत्येक हालचालीवर आता त्यांचे लक्ष असणार आहे.
प्रामुख्याने होळी मैदान, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, वाटर एटीएम, मारु ती मंदिर, राजवाडा, देवरे गल्ली, वाटर टॅँक, मुख्य गल्ली, आदिवासी वस्ती, बस स्टॉप, अमोदे रोड, वेहेळगाव रोड, गिरणेश्वर मंदिर, जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. यासाठी ५ लाख १७ हजार रुपये इतका निधी खर्च करण्यात आला आहे.
चोरावर यापुढे असणार सक्त नजर.
लपणार नाहीत राजकीय हालचाली.
पारावरची मंडळी येणार कॅमेºयात.
पारदर्शक होणार ग्रामपंचायत कारभार.