अभियांत्रिकीचा आजपासून तिसरा कॅपराउंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:19 IST2018-07-18T01:19:26+5:302018-07-18T01:19:57+5:30

नाशिक : अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर बुधवारपासून (दि.१८) तिसºया कॅपराउंड अंतर्गत प्रवेशास सुरुवात होणार आहे. कॅप १ व कॅप २ मिळून आतापर्यंत ११ हजार ४१७ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांची तिसºया कॅपराउंडसाठी अलॉटमेंट लिस्ट बुधवारी (दि.१७) जाहीर करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना शुक्रवारपर्यंत (दि.२०)पर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे.

Third caprape today from Engineering | अभियांत्रिकीचा आजपासून तिसरा कॅपराउंड

अभियांत्रिकीचा आजपासून तिसरा कॅपराउंड

नाशिक : अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर बुधवारपासून (दि.१८) तिसºया कॅपराउंड अंतर्गत प्रवेशास सुरुवात होणार आहे. कॅप १ व कॅप २ मिळून आतापर्यंत ११ हजार ४१७ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांची तिसºया कॅपराउंडसाठी अलॉटमेंट लिस्ट बुधवारी (दि.१७) जाहीर करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना शुक्रवारपर्यंत (दि.२०)पर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे.
प्रवेशप्र्रक्रियेच्या पहिल्या व दुसºया फेरीत प्रथम पसंतीची जागा फ्रीज करणाºया विद्यार्थ्यांसह तिसºया फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना २२ जुलैपर्यंत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रं व निश्चित शुल्क भरून प्रवेशप्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. त्यानंतर ३० जुलैला शासकीय, शासन अनुदानित संस्था व विद्यापीठ विभागातील रिक्त जागांचा तपशील जाहीर केला जाणार असून, ३० जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना आॅप्शन फॉर्म भरता येणार आहे.

Web Title: Third caprape today from Engineering