सावळघाटात एकाच वळणावर तिसरा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 00:28 IST2021-07-19T22:59:48+5:302021-07-20T00:28:31+5:30
पेठ : गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर पेठ तालुक्यातील सावळघाटात एका मोठ्या वळणावर एका महिन्यात ३ अवजड वाहने पलटी झाल्याने अपघाताची मालिकाच सुरू झाली आहे.

सावळघाटात एकाच वळणावर तिसरा अपघात
पेठ : गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर पेठ तालुक्यातील सावळघाटात एका मोठ्या वळणावर एका महिन्यात ३ अवजड वाहने पलटी झाल्याने अपघाताची मालिकाच सुरू झाली आहे.
रविवारी (दि.१९) सोलापूरहून साखर घेउन गुजरातकडे जाणारा ट्रक (एम एच ४२ टी ६९९९) सावळघाटातील मध्यावर ताबा सुटल्याने उतारावरून पलट्या घेत खालच्या रस्त्यावर आला. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नसली तरी गाडीतील साखरेच्या गोण्या रस्त्यावर फेकल्या गेल्या. यामध्ये वाहनाचेही मोठे नुकसान झाले. याबाबत पेठ पोलिसात औदुंबर रामलिंग कोंढारे (२६, राहणार बार्शी, सोलापूर) याच्या फिर्यादीवरून वाहन अपघाताची नोंद करण्यात आली आहे. एक आठवड्याच्या अंतराने या वळणावर तीन वाहने पलटी झाल्याने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. (१९ पेठ)