चोरट्यांनी सी सी टी व्ही कॅमेरेच चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 01:29 IST2020-09-18T23:29:04+5:302020-09-19T01:29:19+5:30

देवळाली कँम्प : गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भगूर नगरपालिकेचे नगरसेविका ढगे यांच्या दुकानासमोर लावलेले सीसीटीव्ही कँमेरेच चोरट्यांनी काढून नेल्याची तक्रार नोंदविण्यात आली असून तक्रार नोंदविण्यासाठी तीन दिवसांचा वेळ लागला आहे.

The thieves stole the CCTV camera | चोरट्यांनी सी सी टी व्ही कॅमेरेच चोरले

चोरट्यांनी सी सी टी व्ही कॅमेरेच चोरले

ठळक मुद्देदेवळाली कँम्प पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार अर्ज

देवळाली कँम्प : गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भगूर नगरपालिकेचे नगरसेविका ढगे यांच्या दुकानासमोर लावलेले सीसीटीव्ही कँमेरेच चोरट्यांनी काढून नेल्याची तक्रार नोंदविण्यात आली असून तक्रार नोंदविण्यासाठी तीन दिवसांचा वेळ लागला आहे.
देवळाली कँम्प पोलीस ठाण्यात शाम मारूती ढगे यांनी दिलेल्या तक्रारीत मंगळवारी१४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी रात्री साडे अकरा वाजता दुकानासमोर लावलेला सीसीटीव्ही कँमेरा दुचाकी वाहनावरील तीघांनी काढून नेल्याची तक्रार केली आहे.देवळाली कँम्प पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार अर्ज घेण्यासाठी पोलीस प्रशासनाला तीन दिवसांचा कालावधी लागल्याने पोलीसांना चोराची काळजी कि तपासाचा कंटाळाबाबत नागरिक प्रश्न विचारू लागले आहे.भगूर परिसरात पोलीसांनी गस्त वाढविण्याची गरज असून वेताळबाबा रोड,भगूर येथे पोलीस गस्तच होत नसल्याची तक्रार नगरसेविका अनिता ढगे,शाम ढगे,अशोक ठुबे,नितीन करंजकर,संतोष क्षिरसागर, कैलास करंजकर आदिंंनी केली आहे.

Web Title: The thieves stole the CCTV camera