महिलेची सोनसाखळी ओरबाडून चोरट्यांचा पळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 19:02 IST2021-03-07T19:01:36+5:302021-03-07T19:02:02+5:30
पंचवटी : हिरावाडी रोडवर असलेल्या ओमनगर परिसरात रात्री बंगल्याच्या बाहेर शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातून २८ ग्रॅम वजनाची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या भामट्याने ओरबाडून नेल्याची घटना काल शनिवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमाराला घडली.

महिलेची सोनसाखळी ओरबाडून चोरट्यांचा पळ
पंचवटी : हिरावाडी रोडवर असलेल्या ओमनगर परिसरात रात्री बंगल्याच्या बाहेर शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातून २८ ग्रॅम वजनाची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या भामट्याने ओरबाडून नेल्याची घटना काल शनिवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमाराला घडली.
या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अज्ञात सोनसाखळी चोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरावाडी मुख्य रस्त्यावर वैशाली मयूर झंवर यांचा बंगला असून शनिवारी (दि.६) रात्री जेवण झाल्यानंतर त्या बंगल्याच्याबाहेर शतपावली करत असतांना दुचाकीवरून
आलेल्या भामट्याने त्यांच्या गळ्यात असलेल्या सोनसाखळी ओरबाडली. यावेळी झालेल्या झटापटीत साखळीचा काही भाग तुटला तर चोरट्याने ७५ हजार रुपये किंमतीची २८ ग्रॅम सोनसाखळी चोरी करून पळ काढला. विशेष म्हणजे ऐन वर्दळीच्या रस्त्यावर सदर सोनसाखळी चोरी घटना घडल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.
यापूर्वीही याच रस्त्यावर अनेकदा सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुले काट्या मारुती पोलिस चौकी, बिट मार्शल व गुन्हा शोध पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर परिसरातील नागरिकांकडून प्रश्नचिह उपस्थित केले जात आहे.