शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

चोरट्यांनी महिलेचा ‘राणीहार’ लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:59 IST

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून, चोरट्यांकरिता हा हंगाम जणू पर्वणीच ठरत आहे. लग्नसोहळ्यासाठी बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये घरफोडी असो किंवा विवाह सोहळ्याच्या गर्दीचा फायदा घेत मंगल कार्यालये, लॉन्समध्ये चोरी करण्याचे प्रकार शहरात वाढले आहेत.

नाशिक : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून, चोरट्यांकरिता हा हंगाम जणू पर्वणीच ठरत आहे. लग्नसोहळ्यासाठी बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये घरफोडी असो किंवा विवाह सोहळ्याच्या गर्दीचा फायदा घेत मंगल कार्यालये, लॉन्समध्ये चोरी करण्याचे प्रकार शहरात वाढले आहेत. तपोवनात अशाच पद्धतीने दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांनी एका लॉन्सच्या परिसरात रस्ता ओलांडणाºया महिलेच्या गळ्यातील ‘राणीहार’ ओरबाडून पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे.तपोवन चौफु लीवरील एका लॉन्समध्ये विवाह सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी स्वाती विजय परमेश्वर (३३, रा. पुणे) या वाहनातून उतरल्या व रस्ता ओलांडत असताना पल्सरसारख्या मोटारसायकलवरून दोघे अज्ञात चोरटे भरधाव आले व त्यांनी त्यांच्या गळ्यात असलेला साडेतीन तोळे वजनाचा सुमारे ७० हजार रुपये किमतीचा राणीहार ओरबाडून धूम ठोकली. या हारवर २ हजाराचे एक ग्रॅम सोन्याचे एक गंठणही बनविलेले होते. एकूणच चोरट्यांनी जबरी लूट करत ७२ हजारांचा ऐवज लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी अज्ञात सोनसाखळी चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक सदाफुले करीत आहेत.गंगापूररोडवरील एका लॉन्समध्ये चक्क वधू कक्षात ठेवलेले सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याचे उघडकीस आले होते. तसेच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिडको परिसरात नागरिकांच्या घरांची कुलपे तोडून हजारो ते लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली होती.ऐन निवडणुकीची धामधूम अन् लग्नसराईचा हंगाम एकाचवेळी आल्यामुळे पोलीस निवडणूक बंदोबस्तात अडकले असताना चोरट्यांसाठी मात्र लग्नसराई सुगीची ठरत असून ते नागरिकांच्या दागिन्यांवर डल्ला मारताना दिसून येत आहे. कायदासुव्यवस्था टिकविण्यासोबत पोलिसांपुढे शहरात वाढलेल्या जबरी चोºयाही रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी