येवला : शहरातील फत्तेबुरुज नाका येथून चोरीस गेलेली दुचाकी अवघ्या ७२ तासात संशयित चोरट्यासह ताब्यात घेण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.शहरातील फत्तेबुरूज नाका येथील संजीवन हॉस्पिटल येथून हॉस्पिटल मधील कर्मचा-याची दुचाकी (क्रमांक एमएच १५ इजे ६२१७) चोरीस गेली होती. सीसी फुटेजच्या आधारे शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांनी जलदगतीने चक्रे फिरवली. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी सोमवारी, (दि. ४) मिळालेल्या गुप्त महितीवरून सहकारी पोलीस नाईक राजू पाटील, पोलीस शिपाई तौफीख शेख यांच्यासह समता नगर, खडकी ता. कोपरगाव येथे छापा मारून प्रवीण अशोक खंडीझोड याच्यासह दुचाकी हस्तगत केली.दरम्यान, संशयित खंडीझोड यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
दुचाकीसह चोरटा पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 01:29 IST