जिल्ह्यावर दाटले ढग; शहरात हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 12:38 AM2019-09-12T00:38:22+5:302019-09-12T00:38:45+5:30

नाशिक : आठ-दहा दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी जिल्ह्यात अपेक्षित पाऊस होऊ शकलेला नाही. घाटमाथ्यावरील इगतपुरी वगळता जिल्ह्याला अद्यापही पावसाने हुलकावणी दिलेली आहे.

Thick clouds over the district; Bullying in the city | जिल्ह्यावर दाटले ढग; शहरात हुलकावणी

जिल्ह्यावर दाटले ढग; शहरात हुलकावणी

Next
ठळक मुद्देइगतपुरीत धोधो : पेठ, त्र्यंबकेश्वरला पावसाच्या सरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आठ-दहा दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी जिल्ह्यात अपेक्षित पाऊस होऊ शकलेला नाही. घाटमाथ्यावरील इगतपुरी वगळता जिल्ह्याला अद्यापही पावसाने हुलकावणी दिलेली आहे.
आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने धरणांमधून विसर्ग करावा लागल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहिले. जिल्ह्यातील धरणे तृप्त झाल्यामुळे पाण्याचादेखील प्रश्न मिटला. त्यानंतर श्रावणातील पाऊस वगळता पावसाचा पाठशिवणीचा खेळ सुरूच आहे. मुंबईतील पावसानंतर नाशिकमधील घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस मात्र सुरूच आहे. इगतपुरीत बुधवारी ५४ मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसाचा तालुका असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये १२ तर पेठमध्ये १४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. बुधवारी जिल्ह्यातील पावसाची टक्केवारी केवळ ७.५ टक्के नोंद झाली आहे.
सर्वाधिक पाऊस हा इगतपुरीमध्ये नोंदविण्यात आला. पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरीत पावसाचा जोर कायम आहे. यंदा पेठवर पावसाची कृपादृष्टी चांगलीच बरसली आहे. त्र्यंबकेश्वरमध्येही चांगला पाऊस झाला. या महिन्यात म्हणजेच १ सप्टेबरपासून ११ तारखेपर्यंत इगतपुरीत ४९४ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. तर पेठमध्ये २८५ मि.मी. पावसाची नोंद झाली. दहा दिवसांत त्र्यंबकेश्वरमध्ये १९९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गंगापूर धरण समूहात होणाऱ्या पावसामुळे धरणांचा पाणीसाठा वाढत आहे. बुधवारी (दि.११) गंगापूर व आळंदी धरणात १००, तर कश्यपीमध्ये ९९ आणि गौतमी गोदावरीत ९८ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे धरणातून गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने विसर्ग सुरू आहे.जल्ह्यातील प्रकल्पांमधील पाण्यासाठी ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या धरण प्रकल्पांमध्ये सध्या ९४ टक्के इतका पाणीसाठा आहे. मागीलवर्षी जिल्ह्यातील पाणीसाठ्याची टक्केवारी अवघी ८० टक्के इतकी होती. त्यामुळे पाणी नियोजन आणि पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागली होती. यंदा मात्र समाधानकारक पाऊस आहे. पावसाची टक्केवारीनाशिक ३.२, इगतपुरी ५४.०, दिंडोरी ४.०, पेठ १४.०, त्र्यंबकेश्वर १२.०, मालेगाव शून्य, नांदगाव शून्य, चांदवड २.०, कळवण २.०, सुरगाणा १०.१, देवळा शून्य, निफाड ६.०, सिन्नर ४.०, येवला शून्य याप्रमाणे पावसाची टक्केवारी राहिली.

Web Title: Thick clouds over the district; Bullying in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस