अनवाणी विद्यार्थ्यांच्या पायात ‘त्यांनी’ चढविली पायताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:26 IST2021-03-13T04:26:54+5:302021-03-13T04:26:54+5:30
बारावकर यांनी आपल्या नातवाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पेठ तालुक्यातील हनुमाननगर येथील शाळेतील ५० मुलांना स्कूल शूजचे वाटप ...

अनवाणी विद्यार्थ्यांच्या पायात ‘त्यांनी’ चढविली पायताण
बारावकर यांनी आपल्या नातवाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पेठ तालुक्यातील हनुमाननगर येथील शाळेतील ५० मुलांना स्कूल शूजचे वाटप केले. याशिवाय हनुमाननगरच्या आदर्श शाळेला रोख देणगीही देण्यात आली.
याप्रसंगी निवृत्त पोलीस उपायुक्त मोहन मोहाडीकर, बँक अधिकारी दीपक वैद्य, उपअभियंता सुरेश देवरे, कुसुमाग्रज मराठी विचार मंचचे अध्यक्ष सतीश बोरा, सरचिटणीस दिलीप बारावकर, खजिनदार जयप्रकाश मुथा, उज्ज्वला बारावकर, निखिल बारावकर, भाग्यश्री बारावकर, प्रेरणा देशमुख, प्रज्वलिता देशमुख, सुरेखा बोरा, पोलीस पाटील रामदास महाले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर भोये, मुख्याध्यापक जयराम कुंभार आदी उपस्थित होते.
फोटो - १२ पेठ हनुमाननगर
हनुमाननगर ता.पेठ येथे शालेय विद्यार्थ्यांना स्कूल शूज वाटप प्रसंगी बारावकर परिवार व कुसुमाग्रज मराठी विचार मंचचे पदाधिकारी.
===Photopath===
120321\12nsk_10_12032021_13.jpg
===Caption===
फोटो - १२ पेठ हनुमाननगर हनुमाननगर ता. पेठ येथे शालेय विद्यार्थ्यांना स्कूल शूज वाटप प्रसंगी बारावकर परिवार व कुसूमाग्रज मराठी विचार मंचचे पदाधिकारी.