ना हातात बसतात, ना खिशात मावतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:16 IST2021-08-15T04:16:39+5:302021-08-15T04:16:39+5:30
असे मोबाईल चोरट्यांच्या फायद्याचे ठरतात...! डमी- 1046 --- अँड्रॉइड स्मार्टफोनवर डल्ला : अलगद मोबाईल घेऊन पोबारा नाशिक : स्मार्टफोन ...

ना हातात बसतात, ना खिशात मावतात
असे मोबाईल चोरट्यांच्या फायद्याचे ठरतात...!
डमी- 1046
---
अँड्रॉइड स्मार्टफोनवर डल्ला : अलगद मोबाईल घेऊन पोबारा
नाशिक : स्मार्टफोन जितका सोयीस्कर तितकाच तो असुरक्षितदेखील ठरतो. बहुतांश मोबाईल हँडसेटची लांबी अधिक अन् वजनालाही जास्त असल्याने ते खिशातही मावत नाहीत अन् हातातही बसत नाही, त्यामुळे चोरटे असे मोबाईल अलगद घेऊन पोबारा करण्याच्या घटना वाढीस लागत आहेत.
नाशिक शहरात स्मार्टफोन खरेदीची क्रेझ दिवसेंदिवस वाढीस लागत आहे. जास्त बॅटरी बॅकअपकरिता लांबलचक अन् वजनालाही जास्त असलेल्या स्मार्टफोनला नाईलाजाने तरुणाई पसंती देते. तसेच काही हँडसेट स्लिम जरी असल्याचा दावा कंपन्यांकडून केला जात असला तरी मोबाईल कव्हर लावल्यानंतर त्याचा आकार आपोआपच वाढलेला असतो. त्यामुळे असे मोबाईल खिशामध्येही बसत नाहीत म्हणूनच काही लोक मोबाईल आपल्या पँटच्या मागील खिशातदेखील ठेवतात, असे मोबाईल चोरट्यांकडून अगदी सहजच लंपास केले जातात.
-----
चोरी नव्हे गहाळ म्हणा..!
अनेकदा मोबाईल चोरी झाला तरी बहुतांश पोलीस ठाण्यात चोरीऐवजी गहाळ झाला असे म्हणण्यास सांगितले जाते.
मोबाईल गहाळ झाल्याची स्वतंत्र नोंदवही असते, आणि त्यामध्ये त्याची नोंद पोलीस घेतात. संबंधित मोबाईल मालकाला त्याच्या तक्रार अर्जांवर ठाणे अंमलदाराकडून शिक्का मारून दिला जातो आणि भोळ्याभाबड्या लोकांना असे वाटते की आपण मोबाईल चोरीची तक्रार देऊन आलो, त्यामुळे आता पोलीस मोबाईल चोरांचा शोध घेऊन त्यांच्याकडून चोरीचे मोबाईल हस्तगत करतील, या आशेने ते मुकाट्याने पोलीस ठाण्यातून बाहेर पडतात; मात्र अनेकांच्या पदरी निराशाच पडते.
----
या भागांमध्ये मोबाईल सांभाळा
पंचवटी भाजी मार्केट यार्ड
पवननगर भाजी बाजार
नाशिकरोड रेल्वेस्थानक
जेलरोड भाजी बाजार
मेनरोड, रविवार कारंजा, अशोकस्तंभ
भद्रकाली, कॉलेजरोड या भागात बहुसंख्य लोकांचे मोबाईल चोरट्यांकडून लांबविले जातात
-----
शहरातील मोबाईल चोरीच्या घटना
2019- 118
2020- 85
2021- 78 ( मे पर्यंत)