हे रेल्वेचे आरक्षित डबे आहेत की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:16 IST2021-09-18T04:16:18+5:302021-09-18T04:16:18+5:30
नाशिक रोड: कोरोनामुळे रेल्वे प्रशासनाने फक्त कन्फर्म आरक्षण तिकीट असलेल्या प्रवाशाला प्रवास करण्यास परवानगी दिली असल्याने लांब पल्ल्याच्या ...

हे रेल्वेचे आरक्षित डबे आहेत की
नाशिक रोड: कोरोनामुळे रेल्वे प्रशासनाने फक्त कन्फर्म आरक्षण तिकीट असलेल्या प्रवाशाला प्रवास करण्यास परवानगी दिली असल्याने लांब पल्ल्याच्या रेल्वेच्या काही डब्यात निर्धारित जागेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत आहे. मात्र ज्या रेल्वे राज्यांतर्गत किंवा कमी पल्ल्याच्या प्रवासाच्या आहेत. त्या रेल्वेमध्ये मात्र वेटिंग लिस्टमधील आरक्षण तिकिटाचे प्रवासीदेखील ज्यादा प्रमाणात प्रवास करत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसगार्मुळे रेल्वे प्रशासनाने सर्वसाधारण तिकीट बंदच करून टाकले आहे. तसेच ज्या प्रवाशाकडे कन्फर्म आरक्षण तिकीट आहे त्यांनाच प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे रेल्वेच्या डब्यातील प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. ज्या लांब पल्ल्याच्या रेल्वे आहे त्या रेल्वेच्या काही डब्यात आरक्षण तिकीट वेटिंग असतानाही काही प्रवासी प्रवास करत आहे. तसेच ज्या रेल्वे राज्यांतर्गत किंवा कमी पल्ल्याच्या आहेत. ज्यांना जवळचे जास्त थांबे आहेत. अशा रेल्वेमध्ये कन्फर्म आरक्षण तिकिटाचा सोबत ज्या प्रवाशांचे वेटिंगमध्ये तिकीट आहे असे प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रवास करत आहे.
-----
विक्रेत्यांचीच गर्दी जास्त
रेल्वेने कोरोनामुळे रेल्वेतील खान-पान व्यवस्था पूर्णपणे बंद केल्यामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेमधील प्रवाशांचे हाल होत असल्याचे पाहून आता विक्रेत्यांचीच रेल्वेमध्ये गर्दी होऊ लागली आहे. तसेच राज्यांतर्गत धावणाऱ्या रेल्वेतही विक्रेते दिसू लागले आहेत.
------
सर्व गाड्यांमध्ये स्थिती सारखीच
* नाशिकरोड मार्गे जाणाऱ्या जवळपास सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये गर्दीचे प्रमाण कायम आहे.
* सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे रेल्वेला गर्दी होत असून, प्रवासी जागा मिळेल तेथे बस्तान मांडत आहेत.
* प्रवाशांची गर्दी प्रामुख्याने मंगला एक्सप्रेस, पवन, कामयानी, काशी, मुंबई पटना सुपरफास्ट, तपोवन, नागपूर या रेल्वेला होत आहे.
----------
आरक्षण, विनातिकीट प्रवास नाही
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना वेटिंग, आरक्षण तिकीट घेऊनच रेल्वेतून प्रवास करीत आहेत. आरक्षण असल्याशिवाय कोणालाही रेल्वेत प्रवेश नाही. त्यामुळे प्रवाशांची गर्दी असली तरी, रेल्वेत जितके शिट आहे, तितकेच प्रवासी प्रवास करतात.
- रेल्वे अधिकारी