दाखल्यांसाठी होणार धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 01:02 IST2020-07-21T21:26:12+5:302020-07-22T01:02:09+5:30
नाशिक : अकरावीच्या प्रवेशासाठी लागणारे दाखले मिळविताना विद्यार्थ्यांची होणारी धावपळ आणि त्यातून काही केंद्रांकडून होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले देण्याची संकल्पना फलद्रुप होऊ न शकल्याने यंदाही विद्यार्थ्यांची धावपळ होण्याची शक्यता आहे.

दाखल्यांसाठी होणार धावपळ
नाशिक : अकरावीच्या प्रवेशासाठी लागणारे दाखले मिळविताना विद्यार्थ्यांची होणारी धावपळ आणि त्यातून काही केंद्रांकडून होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले देण्याची संकल्पना फलद्रुप होऊ न शकल्याने यंदाही विद्यार्थ्यांची धावपळ होण्याची शक्यता आहे. सध्या सेतू केंद्रे बंद असल्याने विद्यार्थ्यांना ‘आपले सरकार’ संकेतस्थळावरून दाखल्यांसाठी आॅनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. विद्यार्थी घरूनही या सुविधेच्या माध्यमातून अर्ज करू शकणार आहेत.
इयत्ता दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशासाठी लागणाºया दाखल्यांसाठी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी अर्ज दाखल करतात. त्यामुळे निर्माण होणाºया सर्व्हरच्या अडचणी आणि डिजिटल सिग्नेचरसाठी दाखले रखडले जात असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या तारखेपर्यंत महत्त्वाचे दाखले मिळत नाही. शेवटी विद्यार्थ्यांना अर्ज सादर केल्याची पावती अर्जाला जोडून दाखल्यांची प्रतीक्षा करावी लागते.
दाखले वितरणाची प्रक्रिया सुरूचकोरोना संकटात सर्वप्रकारच्या मर्यादा असताना १ एप्रिलपासून १८ तारखेपर्यंत जिल्ह्यात तब्बल ४६ हजार १९२ दाखल्याचे वितरण झाले आहेत. नऊ हजार ८२४ अर्ज प्रलंबित आहेत. नॅशनॅलिटीचे ५,९३०, कृषी दाखले ४३, जातीचे दाखले ६,०९८, उत्पन्नाचे दाखले २९,४५५, तर नॉनक्रिमिलिअरचे ३,१६३ इतक्या अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. ९,८२४ अर्ज अजूनही प्रतीक्षेत आहेत.