शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीनंतर  विरोधकच नसतील : महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 01:27 IST

मतदारांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्यावर विश्वास दाखविला. निवडणुकीत मोदींची त्सुनामीच दिसून आली. भाजपचे ३०३ खासदार निवडून आले. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच हवा आहे.

नाशिक : मतदारांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्यावर विश्वास दाखविला. निवडणुकीत मोदींची त्सुनामीच दिसून आली. भाजपचे ३०३ खासदार निवडून आले. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच हवा आहे. त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षातील नेते भाजपात प्रवेश करीत असून, विरोधी पक्षनेतेदेखील भाजपत आले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात विरोधकच शिल्लक राहणार नसल्याची टिका पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केली. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक नाशिकमध्ये पार पडली. त्याच्या समारोप सोहळ्यात महाजन बोलत होते. व्यासपीठावर महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष माधवी नाईक, खासदार भारती पवार, महिला मोर्चा राष्ट्रीय चिटणीस पूजा मिश्रा, आमदार देवयानी फरांदे, माजी राष्ट्रीय अध्यक्ष कांता नलावडे, महापौर रंजना भानसी, नीता केळकर, उमा खापरे, महिला मोर्चा शहराध्यक्ष रोहिणी नायडू उपस्थित होते. महाजन यांनी यावेळी बोलताना आगामी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला ५० जागांही जिंकता येणार नसल्याचे भाकित केले. आतापर्यंतच्या निवडणुकीत माझा शब्द कधीच खोटा ठरला नसल्याचेही त्यांनी नमूद केले. लोकसभेच्या निवडणुकीत तीनशेहून अधिक जागा निवडूण येतील असे कोणालाच वाटले नव्हते. मात्र मोदी सरकारच्या कामगिरीवर मतदारांनी विश्वास दाखविल्याने भाजपाला पुन्हा एकदा विजय प्राप्त करता आला आहे. त्याचप्रमाणे राज्यात मुख्यमंत्र्यांचे काम असून, गेल्या ५०-६० वर्षांपासून रखडलेला मराठा आरक्षणाचा प्रश्नही त्यांनी कायदेशीर चौकटीत बसवून मार्गी लावला आहे. अशा परिस्थितीत एकीकडे काँग्रेसी नेत्याचे तिघांचे तोंड तीन दिशेला आहे, तर दुसरीकडे विरोधी बाकावर पहिल्या फळीत बसणारे नेते भाजपात प्रवेश करण्यासाठी काहीत तरी करा, असे सांगत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत विरोधक ५० जागाही जिंकू शकणार नाहीत . मात्र या निवडणुकीत विजयासाठी सर्वांनी परिश्रम घेतले पाहिजे, त्यासाठी राज्य शासनाने केलेल्या कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे आवाहन गिरीश महाजन यांनी महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना केले.ही तर फिक्ंिसग : चव्हाणविधानसभा निवडणुकीत आघाडीला ५० जागादेखील जिंकता येणार नाहीत, असा दावा पालकमंत्री गिरीश महाजन हे करीत असतील तर याचा अर्थ ईव्हीएम फिक्स आहे, असा संशय कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. लोकसभेपेक्षा विधानसभेचे चित्र वेगळे असेल असे सांगून राज्यात आघाडीला चांगले यश मिळेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला. 

 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपाElectionनिवडणूकcongressकाँग्रेस