ओझर येथे दुसऱ्याही दिवशी एकही बाधित नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 01:05 IST2021-06-08T22:27:20+5:302021-06-09T01:05:03+5:30
ओझर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र थैमान घातलेले असतानाच ओझरला आज दुसऱ्या दिवशीही शून्य कोरोना बाधित आढळले,

ओझर येथे दुसऱ्याही दिवशी एकही बाधित नाही
ठळक मुद्दे बाधित रुग्ण १८ : लवकरच होणार कोरोनामुक्त
ओझर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र थैमान घातलेले असतानाच ओझरला आज दुसऱ्या दिवशीही शून्य कोरोना बाधित आढळले, त्यामुळे ओझरकरांसाठी समाधानाची बाब म्हणावी लागेल.
आरोग्य विभाग, प्रशासन यांच्या प्रयत्नांना नागरिकांनी केलेल्या सहकार्याने हे शक्य होत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. ओझर येथे मंगळवारी (दि. ८) एकही नवा कोरोनाबाधित नाही. कालपर्यंत ओझरसह परिसरातील कोरोनाची पॉझिटिव्ह रुग्णसंख्या एकूण ४,६३३ आहे, पैकी १०२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला.
४,५१३ रुग्ण बरे झाले असून, १८ रुग्णांवर उपचार सुरू असून, ८ रुग्ण रुग्णालयात उपचार घेरत आहेत, तर १० रुग्ण घरीच क्वारंटाईन होऊन उपचार घेत आहेत.