सोन्या-चांदीच्या राख्यांची क्रेझ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 19:28 IST2017-08-05T19:28:23+5:302017-08-05T19:28:59+5:30

बहीण-भावाचे नाते दृढ करणारी राखी ही प्रवाहाप्रमाणे बदलली असून, युवावर्ग आणि कॉर्पोरेट क्षेत्रात आता सोन्या-चांदीच्या राख्यांची क्रे झ वाढली आहे.

 There was a lot of craze in gold and silver | सोन्या-चांदीच्या राख्यांची क्रेझ वाढली

सोन्या-चांदीच्या राख्यांची क्रेझ वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : बहीण-भावाचे नाते दृढ करणारी राखी ही प्रवाहाप्रमाणे बदलली असून, युवावर्ग आणि कॉर्पोरेट क्षेत्रात आता सोन्या-चांदीच्या राख्यांची क्रे झ वाढली आहे. अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर राख्यांची ही गरज पूर्ण करण्यासाठी नाशिकमधील सर्व सराफी पेढ्यांमध्ये सोन्या-चांदीच्या राख्यांचे शेकडो प्रकार उपलब्ध आहेत. खिशाला परवडेल अशा दरात म्हणजे अगदी सातशेपासून पाच हजार रु पयांपर्यंत सोन्याच्या डिझायनर राख्या सराफ व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.
सध्या सोन्याच्या राख्यांना जास्त मागणी आहे. यात स्टोन राखी, एम्बास, अँटीक वर्क, कुंदन वर्क, पोलकी वर्क अशा विविध प्रकारच्या राख्यांना पसंती दिली जात आहे. तरु णवर्गाच्या मागणीप्रमाणे कमी वजनाच्या आणि दिसायला आकर्षक व सुबक राख्यांना प्रचंड मागणी असल्याचे सुवर्ण व्यावसायिक सांगतात. सोन्याची राखी दिसायला तर आकर्षक असतेच, शिवाय ती वर्षानुवर्षे तशीच जपून ठेवली जात असल्यामुळे अशा राख्या घेण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. सोन्याचे भाव चढेच असल्यामुळे राखीसाठी मोजलेले पैसे म्हणजे एकप्रकारची गुंतवणूकच असते. यातून सणही साजरा होतो व सोने खरेदीचा आनंदही मिळतो. सोन्याच्या राख्यांमध्ये चारशे ते साडेचारशे प्रकार आहेत. चांदीच्या राख्यांनाही चांगली मागणी आहे. मध्यमवर्ग आणि सर्वसामान्य लोकांकडून पूर्वीपासूनच चांदीच्या राखीला पसंती दिली जाते. यंदाही चांदीच्या राख्यांचे शेकडो प्रकार बाजारात दाखल झाले आहेत. यात ब्रेसलेट, जडाऊ कलाकुसरीच्या राख्या, राखी कम ब्रेसलेट, मोत्याच्या राख्या असे विविध प्रकार आहेत. या राख्या दोनशेपासून वीस हजार रु पयांपर्यंत मिळत आहेत.


आॅनलाइन गोल्ड राखी
केवळ सराफांकडेच नाही तर आॅनलाइन पोर्टल्सनेसुद्धा सोन्या-चांदीच्या राख्या उपलब्ध करून दिल्या आहेत. जगाच्या कुठल्याही कानाकोपºयात एका क्लिकवर या राख्या पाठविण्याची सोय उपलब्ध आहे. एकदा आॅर्डर केल्यानंतर तीन ते चार दिवसांत या राख्या घरपोच येतात. आॅनलाइन गोल्ड राख्यांमध्ये गायत्री ओम राखी, हम्सा हँड डायमंड, हनुमान, गणेश, ओम डायमंड अँड गोल्ड, बालाजी, गुरु नानक, स्वस्तिक, त्रिशूल, धर्मचक्र , दुर्गा माँ, साईबाबा, शिवशंकर, लक्ष्मी अशा शेकडो व्हरायटीज उपलब्ध आहेत. सहाशेपासून तीन हजार रु पयांपर्यंत या राख्या मिळतात. चांदीमध्येही असेच शेकडो प्रकार उपलब्ध आहेत. याशिवाय राखी चॉकलेट, राखी गिफ्ट फॉर सिस्टर, राखी विथ मेसेज, राखी कार्ड यांसारख्या सुविधाही आॅनलाइन उपलब्ध आहेत.


राख्यांची नवीन कन्सेप्ट
रक्षाबंधन हा आपला खूपच महत्त्वाचा सण आहे. त्यामुळे बहीण आपल्या भावासाठी चांगल्यात चांगली राखी शोधत असते. सोन्याच्या आकर्षक आणि कमी वजनाच्या राख्या बाजारात आल्यामुळे नवीन पिढीची मागणी पूर्ण होत आहे. सोन्याचे सर्वांनाच आकर्षण असते. बहिणीने दिलेली सोन्याची राखी भाऊ वर्षानुवर्षे जपून ठेवत असतो. सोन्या-चांदीच्या राख्यांची ही नवीन कन्सेप्ट युवा वर्गात चांगलीच रु ळली असून, या राख्यांची मागणी वाढत असल्याचे नाशिकच्या वेगवेगळ्या सराफ व्यावसायिकांनी सांगितले.


ठळक वैशिष्टये
सोन्याच्या स्टोन राख्या, एम्बास, अँटीक वर्क, कुंदन वर्क, पोलकी वर्क आदी विविध प्रकारच्या राख्यांना पसंती.
चांदीच्या राख्यांचेही शेकडो प्रकार बाजारात दाखल.
चांदीत ब्रेसलेट, जडाऊ कलाकुसर, राखी कम ब्रेसलेट, मोत्याच्या राख्या आदी विविध प्रकार.

Web Title:  There was a lot of craze in gold and silver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.