नोंदणी विवाहाविषयी आली जागरूकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST2021-07-17T04:13:18+5:302021-07-17T04:13:18+5:30

खरे तर विवाहाची नोंदणी करणे कायद्यानुसार बंधनकारकच आहे. मात्र, सामाजिक अडचणी उद‌्भवण्याची शक्यता गृहीत धरून नोंदणी विवाहाला प्राधान्य दिले ...

There was awareness about registered marriage | नोंदणी विवाहाविषयी आली जागरूकता

नोंदणी विवाहाविषयी आली जागरूकता

खरे तर विवाहाची नोंदणी करणे कायद्यानुसार बंधनकारकच आहे. मात्र, सामाजिक अडचणी उद‌्भवण्याची शक्यता गृहीत धरून नोंदणी विवाहाला प्राधान्य दिले जाते. किंबहुना तशीच उदाहरणे यापूर्वी दिसून आलेली आहेत; परंतु कोरानामुळे लागलेल्या निर्बंधांच्या काळात नोंदणी पद्धतीच्या विवाहाविषयीची जनजागृती वाढली असल्याचे दिसून येते. लॉकडाऊनच्या नियमांमुळे अनेक सामाजिक संकेतही नव्याने रुजू होत असल्याने ही बाब सकारात्मकच घेतली पाहिजे.

कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळाने अनेक बदल घडून आले आहेत. विवाहाच्या बाबतीतही लोकांमध्ये सकारात्मक बदल झाल्याचे दिसून आले. निर्बंधामुळे गर्दी जमविता येत नसल्याचे निमित्त असले तरी जाणीवपूर्वक नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठीदेखील लोक पुढे आले आहेत. खर्चापेक्षाही कायदेशीर विवाहदेखील महत्त्वाचा असल्याचा विचारही रुजला असल्याचे दिसते. त्यामुळे नोंदणी विवाहाविषयीची नागरिकांमध्ये जागरूकता आल्याचे यावरून म्हणता येईल.

कुटुंबीयांकडून विरोध असेल तरच नोंदणी विवाह केला जातो, हा प्रकार आता बाजूला पडू पाहत आहे. आता स्वेच्छेने नोंदणी विवाहासाठी लोक पुढे येऊ लागले आहेत. वधू-वरांकडील लोक आपल्या मुला-मुलींना नोंदणीसाठी आणत असल्याचे या काळात घडून आले. निर्बंधांच्या काळात झालेल्या विवाहांची संख्या पाहता जुळविलेले विवाह नोंदणी पद्धतीने करण्यात आले आहेत. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना कुटुंबीयांचा विवाह असेल तर त्यांना पोलीस संरक्षण दिले जाते, शिवाय शासनाकडून आर्थिक मदतही मिळते. शासकीय नियमाप्रमाणे विवाह नोंदणी शुल्क घेऊन अशा प्रकारचे विवाह कार्यालयात केेले जातात. लॉकडाऊनच्या काळात विशेषत: गेल्या तीन महिन्यांमध्ये नोंदणी विवाहाचे प्रमाण चांगले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

(फोटो)

( गुडमॉर्निंग पानासाठी)

160721\16nsk_29_16072021_13.jpg

एस.आर. ठाकरे

Web Title: There was awareness about registered marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.