सिडको-सातपूर भागात उद्या पाणीपुरवठा नाही
By Admin | Updated: October 13, 2016 23:59 IST2016-10-13T23:56:23+5:302016-10-13T23:59:50+5:30
सिडको-सातपूर भागात उद्या पाणीपुरवठा नाही

सिडको-सातपूर भागात उद्या पाणीपुरवठा नाही
नाशिक : गंगापूर धरण ते शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नवीन ९०० मि.मी. व्यासाची समांतर डी.आय. पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. सदर पाइपलाइनचे क्रॉस कनेक्शनचे काम करण्यात येणार असल्याने शनिवार, दि. १५ रोजी सकाळी १० वाजेपासून ते रविवार, दि. १६ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत सिडको व सातपूर भागात पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेने कळविले आहे.
पाइपलाइनचे क्रॉस कनेक्शनचे काम शनिवारी (दि.१५) करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी पाणीपुरवठा होणार नाही तर रविवारी सायंकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. प्रामुख्याने, शनिवारी-रविवारी पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक १५ व २२, नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक ६१ मधील पिंपळगाव खांब व वडनेर गेट परिसर, सिडको व सातपूर विभागातील सर्व प्रभागांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)