सिडको-सातपूरमध्ये उद्या पाणीपुरवठा नाही

By Admin | Updated: August 7, 2014 01:42 IST2014-08-07T01:20:44+5:302014-08-07T01:42:04+5:30

सिडको-सातपूरमध्ये उद्या पाणीपुरवठा नाही

There is no water supply in CIDCO-Satpur | सिडको-सातपूरमध्ये उद्या पाणीपुरवठा नाही

सिडको-सातपूरमध्ये उद्या पाणीपुरवठा नाही

 

नाशिक : सातपूर येथील शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र ते अंबड जलकुंभापर्यंत थेट जलवाहिनीअंतर्गत एक हजार मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम शुक्रवारी (दि. ८) हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सातपूर आणि सिडको परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.
सातपूर गाव, जाधव संकुल, सावरकरनगर, महात्मानगर, पारिजातनगर, वनवैभव कॉलनी, केवल पार्क, भोर वस्ती, काळेनगर, रामराज्य, गंगापूररोडवरील सावरकरनगर, मते नर्सरी, विश्वास लॉन परिसर, मॉडेल कॉलनी, कृषिनगर, एसटी कॉलनी या भागात, तसेच सिडको विभागातील अंबड गाव, स्वामीनगर, महालक्ष्मीनगर, डीजीपीनगर, माउली लॉन परिसर, धनदाई कॉलनी, चाणक्यनगर, खुटवडनगर, श्री स्वामी समर्थनगर, आयटीआय पूल परिसर त्याचप्रमाणे रविकिरण सोसायटी, सदिच्छानगर, किशोरनगर, कानिफनाथनगर, अश्वमेध कॉलनी, राजीवनगर, युनियन बॅँक, सराफ लॉन, उत्तमनगर, म्हाडा कॉलनी, श्रद्धा विहार, श्रद्धा गार्डन, संताजीनगर, पांडवनगरी, खोडे मळा, मंगलमूर्तीनगर, कर्मयोगीनगर, विधातेनगर, बाजीराव तिडकेनगर या भागातही सकाळी दहा वाजेनंतर पाणीपुरवठा होणार नाही. त्याचप्रमाणे शनिवारी (दि. ९) सकाळी पाणी वितरण कमी दाबाने होईल, असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: There is no water supply in CIDCO-Satpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.