स्वयंसेवी संस्था सक्षम करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:51 IST2019-04-09T00:51:36+5:302019-04-09T00:51:58+5:30

मविप्र समाज संचलित समाजकार्य महाविद्यालय आणि बॉश इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एन.जी.ओ. आणि सी.एस.आर. पार्टनरशिप या विषयावर एकदिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. सामाजिक बांधिलकीसाठी स्वयंसेवी संस्था सक्षम करण्याची गरज आहे,

There is a need to enable NGOs | स्वयंसेवी संस्था सक्षम करण्याची गरज

स्वयंसेवी संस्था सक्षम करण्याची गरज

नाशिक : मविप्र समाज संचलित समाजकार्य महाविद्यालय आणि बॉश इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एन.जी.ओ. आणि सी.एस.आर. पार्टनरशिप या विषयावर एकदिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. सामाजिक बांधिलकीसाठी स्वयंसेवी संस्था सक्षम करण्याची गरज आहे, असा सूर या परिसंवादात उमटला.
सदर परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्ष अमृता पवार, नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शांताराम बडगुजर, एन.जी.ओ. फोरमचे सचिव राजू शिरसाठ, बॉशचे क्षेत्रसंचालक सुसांत कुमार राऊत, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख आदी उपस्थित होते.
याप्रसंगी अमृता पवार यांनी एनजीओ आणि कंपनी यांच्यातील सुसंवादाने दोघांमधील दरी कमी करून एकमेकांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन केले. एनजीओ या विकास प्रक्रि यामधील महत्त्वाचा घटक असून, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी सीएसआर निधीची गरज आहे, असे मत डॉ. शांताराम बडगुजर यांनी व्यक्त केले. तसेच राजू शिरसाठ यांनी एनजीओच्या निधी उभारण्यासाठी सीएसआर निधीचा प्रकल्प अहवाल लेखनाबद्दल प्रवास मांडला.
परिसंवादाच्या प्रथम सत्रात पुणे येथील कर्वे संस्थेच्या प्रा. शर्मिला सहदेव रामटेके यांनी उपस्थित संस्था प्रतिनिधी व समाजकार्यचे विद्यार्थी यांना कंपनी कायद्यातील नवीन सुधारित तरतुदी यांच्याबद्दल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे कोणत्या कंपन्या सीएसआर उपक्र म राबवू शकतात, कायद्यामधील त्यांच्यासाठी असलेले मार्गदर्शक तत्त्वे नमूद केले. त्याचप्रमाणे कंपनी कायद्यामधील नमूद असलेले सीएसआर विषयीचे सर्व मुद्दे सविस्तरपणे सांगितले.
भिला ठाकरे यांनी अशा परिसंवादाचे एनजीओसाठी आयोजन होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रि या नोंदवली. प्रा. चंद्रप्रभा निकम यांनी आभार मानले. प्रास्ताविक सुशांत राऊत यांनी केले. मनोगत डॉ. विलास देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रतिमा पवार यांनी केले. समन्वयक म्हणून प्रा. सोनल बैरागी, स्नेहा जंगम यांनी सहकार्य केले. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
द्वितीय सत्रात जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट सेंटर पुणे येथील कार्यकारी संचालक अनिता पाटील यांना सीएसआर निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रकल्प अहवाल लेखनातील विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. प्रकल्प अहवाल लेखनाची भाषा रचना त्यातील मुद्दे यावर सविस्तरपणे मार्गदर्शन केले.

Web Title: There is a need to enable NGOs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.