शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

सिंचन योजनांबाबत आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 01:24 IST

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे जलसंपदा व ग्रामविकास खात्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याने नाशिक जिल्ह्यातील सिंचनाच्या रखडलेल्या आणि प्रस्तावित योजनांच्या पूर्णत्वाबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रामुख्याने, महत्त्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्प पूर्णत्वाला गती मिळण्याबरोबरच गुजरातला वाहून जाणारे पाणी महाराष्टÑालाच मिळण्यासाठी यापूर्वी भुजबळांनी केलेल्या प्रयत्नांना आणखी बळ लाभणार आहे.

ठळक मुद्देभुजबळांकडे जलसंपदा खाते नार-पारसह महत्त्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे

नाशिक : उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे जलसंपदा व ग्रामविकास खात्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याने नाशिक जिल्ह्यातील सिंचनाच्या रखडलेल्या आणि प्रस्तावित योजनांच्या पूर्णत्वाबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रामुख्याने, महत्त्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्प पूर्णत्वाला गती मिळण्याबरोबरच गुजरातला वाहून जाणारे पाणी महाराष्टÑालाच मिळण्यासाठी यापूर्वी भुजबळांनी केलेल्या प्रयत्नांना आणखी बळ लाभणार आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप गुुरुवारी (दि.१२) जाहीर केले. त्यात नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र छगन भुजबळ यांच्याकडे जलसंपदा, ग्रामविकाससह औषध प्रशासन या महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ यांच्याकडे दीर्घकाळ सार्वजनिक बांधकाम तसेच पर्यटन खाते होते. त्यामुळे जिल्ह्यातील रस्तेबांधणीसह दळणवळणाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागू शकले होते. भुजबळ यांना पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. यंदा जिल्ह्यातील सात तालुके दुष्काळी घोषित करण्यात आले होते तर कधी नव्हे इतक टॅँकरची संख्याही वाढलेली होती. मांजरपाडा-२ प्रकल्पावरून तर राजकीय घमासान पाहायला मिळाले होते. आता भुजबळ यांच्याकडेच जलसंपदा विभागाची जबाबदारी आल्याने मांजरपाडा प्रकल्प पूर्णत्वाला गतिमानता प्राप्त होणार आहे. भुजबळ ज्या येवला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, त्या येवला तालुक्याचा पाणीप्रश्न यंदाही विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा ठरला होता.पालखेड आवर्तनातून येवला शहराला अपुरा पाणीपुरवठा होतो. पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याचे काम मार्गी लागावे, अशी नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे येवल्याचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. यावर्षी पावसाळ्यात मांजरपाडा बोगद्यातून पाणी आल्यानंतर खुद्द भुजबळ यांनीच जलपूजनाचा कार्यक्रम करीत तत्कालीन सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर दिले होते. आता मांजरपाड्याचे पाणी दरसवाडी पर्यंत पोहोचविण्यात भुजबळांचीच भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.चांदवड तालुक्याच्या पाणीप्रश्नावरूनही निवडणुकीत रण पेटले होते. आता मांजरपाडा प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याबरोबरच पुणेगाव कालव्याच्या रुंदीकरणाची मागणी जोर धरू लागणार आहे. निफाड तालुक्यातील दक्षिण भागातील महाजनपूर, तळवाडे यासह काही गावांच्या सिंचनाची सोय व्हावी यासाठी कडवा कॅनॉलवरून पोटचारी अथवा पाणी उचलण्याची परवानगी मिळावी यासाठी मंजुरी मिळाली असली तरी निधीअभावी सदर प्रकल्प रखडलेला आहे. त्यालाही चालना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. कळवण तालुक्यातील ओतुर येथील धरणाच्या गळतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपाययोजना झाली नाही. या धरणाला गळती प्रतिबंधक योजनेतून ७ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. मात्र, तांत्रिक कारणास्तव काम बंद पडले. आता ३१ कोटी रुपयांचा प्रस्ताव अडकलेला आहे. त्यालाही प्राधान्य मिळेल, अशी अपेक्षा आहे.सुरगाणा तालुक्यात प्रस्तावित नार-पार योजना, अंबिका गिरणा खोरे उपसा जोड योजनेंतर्गत ३१ लघुपाटबंधारे योजना व साठवण तलाव तसेच ६५ कोल्हापूर टाइप बंधाऱ्यांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालेले आहेत. आता या योजनांचाही मार्ग मोकळा होण्याची शक्यता वाढली आहे. दिंडोरी तालुक्यातील बारा वळण योजनांपैकी पाच वळण योजना निधीअभावी फडणवीस सरकारने रद्द केल्या होत्या. त्या पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे.जलसंपदा, ग्रामविकासचे नाशिक कनेक्शनमागील सेना-भाजप युती सरकारच्या काळात जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भूषविणारे गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा ह्या खात्याची जबाबदारी होती तर मालेगाव बाह्यचे शिवसेनेचे आमदार दादा भुसे यांच्याकडे ग्रामविकास खात्याचा राज्यमंत्रिपदाचा कार्यभार होता. महाजन-भुसे यांनी आपल्या या खात्याच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सिंचन व ग्रामविकासात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. आता उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये जिल्ह्याचे भुमिपुत्र छगन भुजबळ यांच्याकडे जलसंपदा आणि ग्रामविकास ही दोन्ही महत्त्वपूर्ण खाती आली आहेत. त्यामुळे या दोन्ही विभागाशी निगडित जिल्ह्यात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांना व प्रकल्पांना भुजबळांमुळे चालना मिळणार आहे. या दोन्ही खात्यांचे नाशिक कनेक्शन उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळातही कायम राहिले आहे.नांदगावकरांचा विश्वास कमाविण्याची संधीनांदगाव, मनमाड येथील पाणीप्रश्नानेही यावर्षी उन्हाळ्यात डोके वर काढले होते. मनमाडसाठी ३०० कोटींची पाणीयोजना मंजूर करण्यात आलेली आहे. ती पूर्णत्वास नेण्याबरोबरच या योजनेत नांदगावचाही समावेश करून विधानसभा निवडणुकीत पंकज भुजबळांप्रती मतदारांचा गमावलेला विश्वास पुन्हा एकदा कमाविण्याची संधी भुजबळांपुढे चालून आली आहे.याशिवाय, नांदगाव ५६ खेडी पाणीपुरवठा योजना गिरणा धरण येथून सुरू आहे; मात्र ती कालबाह्य झाल्याने पाणीपुरवठा १० ते १२ दिवसांनी होतो. या योजनेचे पुनरुज्जीवन अथवा नवीन योजनेची अपेक्षा वाढली आहे. करंजवण योजना मागच्या सरकारने प्रस्तावित केली ती झाली तर मनमाड शहराचाही पाणीप्रश्न मार्गी लागू शकेल. जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव, विंचूरसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन नादुरुस्त झालेली असल्याने या योजनेकरिता निधी मिळण्यासंबंधीही लासलगावकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.जिल्ह्यातील प्रलंबित व प्रस्तावित प्रकल्प आणि प्रश्नवालदेवी प्रकल्पग्रस्तांना मोबदला नाहीच्गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना हवीच्गोदावरी पूररेषेतील बांधकामांबाबतचा प्रश्नच्कडवा पाणी योजना प्रलंबितच्सिन्नर तालुक्यात देवनदीचे पूरपाणी पूर्वभागात नेण्यासाठी प्रस्तावित पूरचाºया प्रलंबितच्पुणेगाव कालवा, चणकापूर वाढीव कालवा व गिरणा डावा कालवा प्रकल्प प्रलंबितच्गिरणा, पालखेड, करंजवण या पाणी योजना अधांतरीच्गिरणा धरण योजना नूतनीकरणासाठी निधीची प्रतीक्षाच्कळवण तालुक्यातील ओतूर धरणाचा प्रश्न प्रलंबितच्पुनंद प्रकल्प व त्याअंतर्गत सुळे व सुपले उजवा व डावा कालव्याचे न पोहोचलेले पाणीच्सटाणा शहरासाठी केळझर पाणीयोजना महत्त्वाचीच्हरणबारी डावा व उजवा कालवा तसेच चारी क्रमांक ८ प्रलंबित

टॅग्स :NashikनाशिकIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पChhagan Bhujbalछगन भुजबळ