नगराध्यक्षांशी मतभेद नाहीत
By Admin | Updated: April 30, 2017 23:53 IST2017-04-30T23:53:05+5:302017-04-30T23:53:05+5:30
नगराध्यक्षांशी मतभेद नाहीत

नगराध्यक्षांशी मतभेद नाहीत
सटाणा : बागलाण तालुक्यातील मोसम, करंजाडी आणि हत्ती खोऱ्याला आज रविवारी दुपारी गारपिटीसह वादळी पावसाने झोडपले. या अवकाळीमुळे कांदा, डाळिंब, टमाटा या पिकांचे नुकसान होऊन लाखो रुपयांची हानी झाली.
रविवारी दुपारी १२ वाजेपासूनच ढगाळ वातावरण होऊन कमालीचा उकाडा निर्माण झाला होता. दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळ येऊन निताणे, द्याने, आसखेडा, गोराणे, पारनेर, पिंगळवाडे, भुयाणे, करंजाड, मुंगसे, लाडूद, सोमपूर या भागाला गारांच्या पावसाने झोडपले. करंजाड परिसरात अडीच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. शेतात नुकताच काढलेला कांदा पावसात भिजल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी वारा आणि गारपिटीमुळे कांदा, आंबा, डाळिंब, टमाटा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वनोली व वीरगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊण तास मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले आहे. शेतांमध्ये काढून ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आज लग्नतिथीही दाट असल्यामुळे वऱ्हाडी मंडळींची मोठी धावपळ झाली होती. (वार्ताहर)