लोकासांगे ब्रह्मज्ञान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 00:37 IST2020-06-17T22:34:20+5:302020-06-18T00:37:14+5:30

शहरात कोरोनाचा उद्रेक झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करताना मास्क लावण्याचीदेखील आवश्यकता आहे. मात्र गेल्या काही दिवसांत शहरात झालेल्या मान्यवरांच्या ...

Theology with the people ... | लोकासांगे ब्रह्मज्ञान...

लोकासांगे ब्रह्मज्ञान...

शहरात कोरोनाचा उद्रेक झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करताना मास्क लावण्याचीदेखील आवश्यकता आहे. मात्र गेल्या काही दिवसांत शहरात झालेल्या मान्यवरांच्या दौऱ्यात या नियमांचा फज्जा उडालेला दिसला.
पावसामुळे सराफ बाजार परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ आणि अधिकारी आल्यानंतर गर्दी झाली आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करताच साऱ्यांनी पालकमंत्र्यांना गराडा घातला.
महापौर सतीश कुलकर्णी आणि आमदार देवयानी फरांदे यांच्या दौºयातही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले नव्हते. शिवाय गर्दीतील अनेकांनी नावाला मास्क लावलेले होते.
जुन्या नाशकातील नाईकवाडीपुरा येथे कोरोनाचा हॉटस्पॉट झाल्यानंतर हा संपूर्ण भाग सील करण्यात आला. यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या भेटीतदेखील सुरक्षित अंतर पाळले गेले नाही. विशेष म्हणजे संवाद साधताना काही अधिकाºयांनी मास्क तोंडावरून खाली काढला होता.

Web Title: Theology with the people ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक