विद्या अन् पुण्यच आपले : ओझा

By Admin | Updated: June 26, 2014 01:16 IST2014-06-26T01:14:31+5:302014-06-26T01:16:14+5:30

विद्या अन् पुण्यच आपले : ओझा

Theology and philosophy itself: Oja | विद्या अन् पुण्यच आपले : ओझा

विद्या अन् पुण्यच आपले : ओझा


नाशिकरोड : जीवनात कोणी कोणाचे नसते. फक्त आपण मिळविलेली विद्या व कमवलेले पुण्य आपल्यासोबत चालत असते, असे प्रतिपादन भागवतरत्न मनीषभाई ओझा यांनी केले. आर्टिलरी सेंटररोड महेश भवन येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाच्या दुसऱ्या दिवसाच्या सत्रात बोलताना भागवतरत्न मनीषभाई ओझा म्हणाले की, प्रत्येक श्वास घेताना कृष्ण नामाचा जप केला पाहिजे. कारण श्वासाचा काही भरोसा नाही. जो श्वास आपण घेऊन सोडत आहोत तो पुन्हा घेऊ शकतो की नाही हे आपल्याला माहिती नाही. याकरिता प्रत्येकाने आपला प्रत्येक क्षण आणि प्रत्येक श्वास भगवान गोविंदाच्या चरणी समर्पित केला पाहिजे, असे ओझा यांनी सांगितले.

Web Title: Theology and philosophy itself: Oja