शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

...तर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करणे बेकायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 5:08 PM

वन्यप्राण्याकडून वारंवार नव्हे तर एकदाच मनुष्यावर हल्ला झाल्यास त्या वन्यजीवाला ‘नरभक्षक’ असे म्हणणे चुकीचे आहे, असे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने नव्या मार्गदर्शक तत्वात स्पष्टपणे म्हटले आहे.

ठळक मुद्देवन्यजीव रेस्क्यू करण्याची आदर्श नियमावलीची (एसओपी) माहितीवनविभागाने दोन दिवसीय प्रशिक्षणपर कार्यशाळा आयोजित केली विशेष बचाव पथकाचा चमू घटनास्थळी पोहचून मदत देऊ शकेल

नाशिक : अनुसुची-१मधील एखाद्या वन्यजीवापासून मानवी जीवीतास धोका नसेल तसेच तो वन्यजीव अपंग झाला तर त्या वन्यजीवाला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावणे वन्यजीव संरक्षण कायद्याचा भंग ठरतो. कायद्यान्वये वन्यजीव रेस्क्यूची परवानगी केवळ वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षकच देऊ शकतात, असे प्रतिपादन युथ फॉरे नेचर कॉन्झर्वेशन आॅर्गनायझेशनचे वन्यजीव अभ्यासक डॉ. स्वप्नील सोनोने यांनी केले.अनुसुची-१मधील संरक्षित वन्यप्राणी बिबट्याची संख्या नाशिक शहरासह जिल्ह्यात वाढत आहे. बिबट्याकडून पाळीव पशुधनाला नुकसान पोहचविण्याच्या घटना वारंवार वनविभागाच्या पुर्व-पश्चिम भागामधील विविध गावपातळीवर घडत आहेत. या पार्श्वभूमीवर मानव-बिबट संघर्ष टाळण्यासाठी तसेच कुठल्याहीप्रकारची अपात्कालीन स्थिती उद्भवल्यास तत्काळ विशेष बचाव पथकाचा चमू घटनास्थळी पोहचून मदत देऊ शके ल, या उद्देशाने बचाव पथकाला सज्ज केले जात आहे.बचावपथकाला वन्यजीव रेस्क्यू करण्याची आदर्श नियमावलीची (एसओपी) माहिती तसेच रेस्क्यूचे प्रात्याक्षिकाद्वारे सरावासाठी वनविभागाने दोन दिवसीय प्रशिक्षणपर कार्यशाळा आयोजित केली आहे. शनिवारी (दि.१६) उंटवाडी येथील वनविश्रामगृहाच्या सभागृहात कार्यशाळेला प्रारंभ करण्यात आला. उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, सुजीत नेवसे, वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्यासह दोन्ही विभागाचे मिळून ३५ वनरक्षक यावेळ उपस्थित होते. यावेळी सोनोने यांनी वन्यजीव संरक्षण अधिनियमाचे विविध कलम, पोटकलमांची विस्तृतपणे सोदाहरण माहिती दिली. यावेळी सोनोने म्हणाले, भारतीय वन्यजीव कायद्यातील कलम-११नुसार वन्यजीवांना रेस्क्यू करता येऊ शकते; मात्र त्यासाठी काही नियमावली कायद्याने आखून दिली आहे, त्याचे काटेकोरपणे पालन बंधनकारक आहे, असे सोनोने यावेळी म्हणाले. वन्यप्राण्याकडून वारंवार नव्हे तर एकदाच मनुष्यावर हल्ला झाल्यास त्या वन्यजीवाला ‘नरभक्षक’ असे म्हणणे चुकीचे आहे, असे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने नव्या मार्गदर्शक तत्वात स्पष्टपणे म्हटले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्याforest departmentवनविभागwildlifeवन्यजीव