शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

...तेव्हा दिलीप कुमारांना पाहण्यासाठी नाशिक सत्र न्यायालयाभोवती लोटली होती चाहत्यांची तोबा गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 16:14 IST

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील एका जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या प्रकरणात झालेल्या फसवणुकीमध्ये दिलीपकुमार अडकले होते. या फौजदारी खटल्याच्या सुनावणीला दिलीपकुमार यांनी उपस्थित रहावे, असे समन्स जिल्हा व सत्र न्यायालयाने काढले होते.

ठळक मुद्देफौजदारी खटल्यात हजर राहण्याचे समन्स गेल्यानंतरही ते उपस्थित न राहिल्याने त्यांच्या नावाचे वॉरंटदेखील न्यायालयाकडून काढण्यात आले होते.

अझहर शेख  

नाशिक : लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले दिग्गज अभिनेते बॉलिवुडचे महानायक दिलीपकुमार हे नाशकात येणार असल्याची वार्ता जेव्हा नाशिककरांच्या कानी पडली होती, तेव्हा त्यांची झलक अनुभवण्यासाठी नाशिककर चाहत्यांची जिल्हा व सत्र न्यायालयात सुमारे वीस वर्षांपुर्वी तोबा गर्दी लोटली होती. यावेळी जिल्हा व सत्र न्यायालयाला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झालेले पहावयास मिळाले होते.

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील एका जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या प्रकरणात झालेल्या फसवणुकीमध्ये दिलीपकुमार अडकले होते. या फौजदारी खटल्याच्या सुनावणीला दिलीपकुमार यांनी उपस्थित रहावे, असे समन्स जिल्हा व सत्र न्यायालयाने काढले होते. त्यांच्या जुहु येथील बंगल्यावर जाऊन समन्स बजावण्यात आला होता, असे ॲड. धर्मेंद्र चव्हाण यांनी त्यांच्याविषयीची आठवण सांगितली. या खटल्यात चव्हाण हे दिलीपकुमार यांच्या विरुध्द पक्षाचे वकील होते. फौजदारी खटल्यात हजर राहण्याचे समन्स गेल्यानंतरही ते उपस्थित न राहिल्याने त्यांच्या नावाचे वॉरंटदेखील न्यायालयाकडून काढण्यात आले होते. यानंतर दिलीपकुमार यांनी सुनावणीच्या तारखेला जिल्हा व सत्र न्यायालयात हजेरी लावली. फौजदारी खटल्यात त्यांनी हजर होण्याची ही पहिलीच वेळ होती. याप्रसंगी त्यांच्या चाहत्यांनी त्यांची झलक बघण्यासाठी प्रचंड गर्दी केल्याने न्यायालयाच्या परिसराला जत्रेचे स्वरुप आले होते. सुनावणी सुरु असेपर्यंत शहराच्या मध्यवर्ती सीबीएससारख्या भागात नागरिकांची गर्दी कायम होती. पोलिसांनी मुख्य रस्त्याच्या बाजूला गर्दी थांबवून ठेवली होती. या खटल्याचा सुनावणीदरम्यान चव्हाण यांच्याकडून युक्तीवादादरम्यान त्यांच्या जामीन अर्जास विरोधही करण्यात आला होता. न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून घेत दिलीपकुमार यांची जामीनावर मुक्तता केली होती. त्यानंतर दिलीपकुमार यांनी विरुध्द पक्षाच्या तडजोडीचा प्रस्ताव मान्य करत या जमीन वाद प्रकरणावर पडदा टाकून समझोता केला होता. यामुळे त्यांच्यावरील सर्व खटले मागे घेण्यात आले होते. या प्रकरणात महिला जमीन मालकास दिलीपकुमार यांनी काही रक्कमदेखील अदा केली होती. हा खटला थेट उच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहचला होता.

दिलीप सहाब नाशिकच्या प्रेमात

दिलीप कुमार यांचे बालपण नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात गेलेले असल्यामुळे त्यांचा तसा नाशिकशी जिव्हाळ्याचा ऋुणानुबंध आला होता आणि तो अखेरपर्यंत कायमच राहिला. गंगा जमुना सारख्या हीट चित्रपटाच्या शुटींगकरितासुध्दा दिलीपसहाब यांनी नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथील इंग्रजकाळातील रोकडे वाड्याला पसंती दिली होती. नाशिकसोबत ते नेहमीच ‘कनेक्ट’ होते. येथील अल्हाददायक वातावरण, त्यावेळेचे टुमदार शांत शहर आणि निसर्गरम्य वातावरण अशा सर्वांमुळे या महानायकाला नाशिकच्या प्रेमात पडण्याचा मोह आवरता येऊ शकला नव्हता. 

टॅग्स :Dilip Kumarदिलीप कुमारNashikनाशिकPoliceपोलिसbollywoodबॉलिवूड