बनकर स्कूलनध्ये थीमबेस मॉडेल प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 22:48 IST2019-12-27T22:47:48+5:302019-12-27T22:48:20+5:30
बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये मुलांच्या वैज्ञानिक कल्पनांना वाव देण्यासाठी शालेयस्तरावर विज्ञान प्रदर्शन पार पडले. बनकर पाटील कॉलेज आॅफ फार्मसीचे प्राचार्य जयप्रकाश कोकणे, प्रा. स्मिता माळी, प्राचार्य पंकज निकम, सुरेश पारधी व अगरचंद शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.

येवला येथील बनकर पाटील स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपकरणांचे परीक्षण करताना प्रा. माळी व मनीषा बनकर.
येवला : येथील बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये मुलांच्या वैज्ञानिक कल्पनांना वाव देण्यासाठी शालेयस्तरावर विज्ञान प्रदर्शन पार पडले. बनकर पाटील कॉलेज आॅफ फार्मसीचे प्राचार्य जयप्रकाश कोकणे, प्रा. स्मिता माळी, प्राचार्य पंकज निकम, सुरेश पारधी व अगरचंद शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.
या थीमबेस प्रकल्प प्रदर्शनात एकूण ४८ उपकरणे मांडण्यात आले होते. यातून दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी व पाठ्यपुस्तकात दिलेल्या विषयाच्या आधारे मानवी जीवन सुखकर करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनातील विविध कल्पना समोर आल्या. भावना करंडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रा. माळी व मनीषा बनकर यांनी सदर उपकरणांचे परीक्षण केले. तेजस्विनी बनकर, दीपक देशमुख, कल्पना पाचंगे, वृषाली शिरसाठ, दीपाली जाधव, प्रतिभा शिंदे, स्वाती भावसार , सुयोग खर्डे यावेळी उपस्थित होते.