मेळा बसस्थानकात महिलेच्या मंगळसूत्राची चोरी
By Admin | Updated: May 23, 2017 21:44 IST2017-05-23T21:44:33+5:302017-05-23T21:44:33+5:30
मेळा बसस्थानकात आलेल्या दिंडोरी येथील महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तीन महिलांनी चोरून नेल्याची घटना

मेळा बसस्थानकात महिलेच्या मंगळसूत्राची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मेळा बसस्थानकात आलेल्या दिंडोरी येथील महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तीन महिलांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि़२२) सकाळच्या सुमारास घडली़
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिंडोरी येथील मनीषा किशोर शिंदे (२६) या सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास मेळा बसस्थानकावर आल्या होत्या़ यावेळी संशयित कांताबाई विनोद सूर्यवंशी (४५, रा़ अहमदपूर, जि़ लातूर) व तिच्या सोबत असलेल्या दोन अनोळखी महिलांनी संगनमत करून शिंदे यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लबाडीने चोरून नेले़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तिघा संशयित महिलांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़