कुसुंबा रोडवरून दुचाकीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 00:57 IST2020-12-07T00:55:52+5:302020-12-07T00:57:06+5:30

मालेगाव : शहरातील कुसुंबारोडवरील नारायण काशीनाथ शिंदे यांच्या दारूच्या दुकानाजवळून अज्ञात चोरट्याने गेल्या मंगळवारी हिरोहोंडा स्प्लेंडर चोरून नेली.

Theft of a two-wheeler from Kusumba Road | कुसुंबा रोडवरून दुचाकीची चोरी

कुसुंबा रोडवरून दुचाकीची चोरी

मालेगाव : शहरातील कुसुंबारोडवरील नारायण काशीनाथ शिंदे यांच्या दारूच्या दुकानाजवळून अज्ञात चोरट्याने गेल्या मंगळवारी हिरोहोंडा स्प्लेंडर (क्र.एमएच ४१/९६३३) चोरून नेली. संदीप वसंतराव शिंदे, रा. द्याने यांनी रमजानपुरा पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रोही करीत आहेत.

चिंचावडला गायींची चोरी

मालेगाव : तालुक्यातील चिंचावड येथे शेतातून गेल्या शुक्रवारी रात्री ११ ते ५ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी ४३ हजार रुपये किमतीच्या ६ गायी चोरून नेल्या. दीपक रामसिंग पवार यांनी तालुका पोलिसांत फिर्याद दिली. दीपक पवार यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या गायी अज्ञात चोरट्यांनी दोर कापून चोरून नेल्या. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस नाईक तिडके करीत आहेत.

Web Title: Theft of a two-wheeler from Kusumba Road