दोन दिवसात दोन चारचाकी वाहनांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:19 IST2021-09-06T04:19:10+5:302021-09-06T04:19:10+5:30
सिन्नर: शहरातून दोन दिवसात दोन चार चाकी वाहनांची चोरी झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी (दि.३) रात्री वंजार ...

दोन दिवसात दोन चारचाकी वाहनांची चोरी
सिन्नर: शहरातून दोन दिवसात दोन चार चाकी वाहनांची चोरी झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी (दि.३) रात्री वंजार गल्लीतील मारुती मंदिरासमोर महेंद्र कंपनीची मॅक्स पिकअप जीप (क्रमांक एम. एच. ४२ एम. ०८७८) अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. योगेश प्रभाकर रोकडे (३२) रा. दुर्गापूर ता. राहाता यांच्या मालकीची सफेद रंगाची पिकअप जीप मारुती मंदिरासमोर उभी केली होती. पहाटे चार वाजेच्या सुमारास पिकअप जीप लंपास झाल्याचे निदर्शनास आले. रोकडे यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात पिकअप चोरीला गेल्याची फिर्याद दिली आहे. तर, दुसरी चोरीची घटना विजयनगर भागातील गजानन चौकात घडली. या चौकात राहणारे शिक्षक माधव विनायक शिंदे यांनी त्यांची स्विफ्ट कार (क्रमांक एम. एच. १५ जी. ए. ९८८४) घराजवळ उभी केली होती. शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी सदर स्विफ्ट कार लंपास केली. दोन दिवसात दोन चारचाकी वाहने चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे.