सोनांबे शिवारातून ट्रकची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 17:49 IST2019-01-10T17:48:49+5:302019-01-10T17:49:00+5:30
सिन्नर : चारा आणण्यासाठी घेऊन जाणारा ट्रक डिझेल संपल्याने मालकाने रस्त्याकडेच्या एका हॉटेलवर उभा केला. दुसऱ्या दिवशी इंधन घेऊन ट्रक लावलेल्या ठिकाणी गेल्यावर मालकास गाडी घटनास्थळी नसल्याचे पाहून धक्का बसला.

सोनांबे शिवारातून ट्रकची चोरी
सिन्नर : चारा आणण्यासाठी घेऊन जाणारा ट्रक डिझेल संपल्याने मालकाने रस्त्याकडेच्या एका हॉटेलवर उभा केला. दुसऱ्या दिवशी इंधन घेऊन ट्रक लावलेल्या ठिकाणी गेल्यावर मालकास गाडी घटनास्थळी नसल्याचे पाहून धक्का बसला. खापराळे फाटयावरील लालबाग हॉटेलजवळ हा प्रकार उघडकीस आला.
सोनारी येथील राजाराम काळुंगे हे दोन दिवसांपूर्वी चारा आणण्यासाठी ट्रक घेऊन गेले होते. मात्र सिन्नर-घोटी मार्गावर खापराळे फाटयाजवळ ट्रकचे इंधन संपल्याने तो बंद पडला. काळुंगे यांनी रस्त्याकडेला असलेल्या लालबाग हॉटेलजवळ हा ट्रक उभा केला होता. त्यानंतर दुसºया दिवशी ते इंधन घेऊन ट्रक आणण्यासाठी सदर ठिकाणी गेले असता तेथे ट्रक उभा नसल्याचे लक्षात आले.