सिन्नर येथून चंदनाच्या झाडाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 17:58 IST2018-09-07T17:57:53+5:302018-09-07T17:58:11+5:30
सिन्नर-सरदवाडी रस्त्यावर बायपास अंडपासजवळील परफेक्ट करिअर अकॅडमीच्या प्रवेशद्वारावरील चंदनाच्या झाडाचा बुंधा अज्ञात चोरट्यांनी कापून नेला.

सिन्नर येथून चंदनाच्या झाडाची चोरी
अकॅडमीचे संचालक आय. जी. गाडे विद्यार्थ्यांचा सराव घेण्यासाठी पहाटे आले असता सदर प्रकार त्यांच्या लक्षात आला. गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांकडून चंदनाच्या झाडांना लक्ष्य केले जात आहे. गेल्या आठवड्यातही ठाणगाव येथून अज्ञात चोरट्यांनी चंदनाच्या झाडावर डल्ला मारला होता. त्या घटनेतील चोरट्यांचा तपास अद्याप लागलेला नसताना, ही दुसरी घटना घडली आहे.