इगतपुरी येथून वाहनाच्या चावीसह दागिन्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 22:49 IST2021-08-21T22:48:59+5:302021-08-21T22:49:24+5:30
इगतपुरी : तालुक्यातील परदेशवाडी खेडची येथून भाऊराव शिवराम मालुंजकर यांच्या राहत्या घरून अज्ञाताने १० हजार रुपये किमतीची हुंडाई कारची चावी, ६ हजार रुपयांची सोन्याची नथ अज्ञाताने चोरून नेल्याची फिर्याद इगतपुरी पोलिसात दाखल करण्यात आली आहे.

इगतपुरी येथून वाहनाच्या चावीसह दागिन्यांची चोरी
ठळक मुद्देबाथरूमच्या खिडक्या तोडून घरात प्रवेश
इगतपुरी : तालुक्यातील परदेशवाडी खेडची येथून भाऊराव शिवराम मालुंजकर यांच्या राहत्या घरून अज्ञाताने १० हजार रुपये किमतीची हुंडाई कारची चावी, ६ हजार रुपयांची सोन्याची नथ अज्ञाताने चोरून नेल्याची फिर्याद इगतपुरी पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
चोरट्याने घराच्या बाथरूमच्या खिडक्या तोडून घरात प्रवेश करीत चोरी केली. याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक धुमसे अधिक तपास करीत आहे.