चोरट्यांचे विघ्न : क्रेनसह ट्रकच्या बॅटऱ्या चोरीला; दुसºयाच दिवशी काम ठप्प ‘सुंदर नारायण’चा कळस उतरविला, पण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:46 IST2018-05-06T00:46:27+5:302018-05-06T00:46:27+5:30
नाशिक : राज्य पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक असलेल्या शहरातील अतिप्राचीन सुंदर नारायण मंदिराच्या देखभाल दुरुस्तीचे काम पहिल्या टप्प्यात शासकीय स्तरावर हाती घेण्यात आले आहे.

चोरट्यांचे विघ्न : क्रेनसह ट्रकच्या बॅटऱ्या चोरीला; दुसºयाच दिवशी काम ठप्प ‘सुंदर नारायण’चा कळस उतरविला, पण...
नाशिक : राज्य पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक असलेल्या शहरातील अतिप्राचीन सुंदर नारायण मंदिराच्या देखभाल दुरुस्तीचे काम पहिल्या टप्प्यात शासकीय स्तरावर हाती घेण्यात आले आहे. दोन दिवसांपासून मंदिराचे जुने दगड क्रेनच्या सहाय्याने उतरविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मंदिराचा मुख्य कळस उतरविल्यानंतर रात्रीच्या वेळी चोरट्यांनी वाहनांच्या बॅटºया पळविल्याने शनिवारी (दि.५) दिवसभर काम ठप्प होते.
शहराच्या मुख्य बाजारपेठांपैकी एक असलेल्या रविवार कारंजा भागात अहल्यादेवी होळकर पुलाला लागून असलेले सुंदर नारायण मंदिर हे राज्याच्या पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. कारण हे मंदिर इसवी सन पूर्व १६७८ अर्थात १७५६ साली पेशव्यांचे सरदार गंगाधर यशवंतराव चंद्रचूड यांनी बांधले होते. मंदिराच्या मुख्य शिखराची उंची सुमारे ६० फूट इतकी आहे. शिखर, गर्भगृह, मंडप, मुख्य मंडप अशी या स्मारकाची रचना आहे. पहिल्या टप्प्यात या रचनेनुसार सुमारे पावणेपाच कोटींचा निधी पुरातत्व विभागाकडून प्राप्त झाला आहे. त्यानुसार दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मंदिराजवळ जादा क्षमतेच्या वीजवाहिन्यांचा विद्युतपुरवठा करणारे रोहित्र असल्यामुळे ते स्थलांतरित करण्यासाठी २४ महिन्यांच्या कालावधीपैकी सहा महिन्यांचा कालावधी गेला. त्यानंतर प्रत्यक्षरीत्या मंदिराच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले गेले. जुने दगड पूर्णपणे निकृष्ट होऊन धोकादायक ठरत असल्याने काढून घेण्यात येत असून, त्या ठिकाणी नव्याने तशाच आकाराचा व नक्षिकाम असलेला दगड लावला जाणार आहे. मंदिराचे सर्वच दगड या दुरुस्तीच्या कामात काढून घेतले जाणार नाहीत, असे पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. त्यानुसार क्रेन लावून संबंधित ठेकेदाराकडून दोन दिवसांपूर्वी कामाला सुरुवात करण्यात आली; मात्र शिखरावरील कळस उतरविल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी रात्रीतून क्रेनसह दोन्ही मालवाहू ट्रकच्या बॅटºया लंपास केल्याने कामामध्ये विघ्न आले. परिणामी शनिवारी दिवसभर दगड उतरविण्याचे व घडविण्याचे काम ठप्प राहिले.