बंद घराचे कुलूप तोडून चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 01:11 AM2021-01-07T01:11:15+5:302021-01-07T01:11:36+5:30

येवला शहरातील पांडुरंग नगरात बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी ६० हजारांच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली आहे.

Theft by breaking the lock of a locked house | बंद घराचे कुलूप तोडून चोरी

बंद घराचे कुलूप तोडून चोरी

googlenewsNext

येवला : शहरातील पांडुरंग नगरात बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी ६० हजारांच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली आहे.
शहरातील पांडुरंग नगर येथील प्रीतम प्रकाश शहारे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रविवारी, (दि. ३) ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व  रोख रक्कम चोरून नेली. शहारे कुटुंबीय नातेवाइकाच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना सकाळी ११ ते दुपारी ३ वाजताच्या दरम्यान सदर घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून  शहर पोलीस निरीक्षक  संदीप कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Theft by breaking the lock of a locked house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.