गोदापात्रात बुडाला युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 01:26 IST2022-04-20T01:25:52+5:302022-04-20T01:26:10+5:30

चार दिवसांपूर्वी गोदावरीच्या गांधी तलावात दोन मुले बुडाली होती, त्यापैकी एकाला वाचविण्यास यश आले होते,तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यापाठोपाठ पुन्हा एका युवकाचा गोदावरीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला.

The youth drowned in Godapatra | गोदापात्रात बुडाला युवक

गोदापात्रात बुडाला युवक

नाशिक : चार दिवसांपूर्वी गोदावरीच्या गांधी तलावात दोन मुले बुडाली होती, त्यापैकी एकाला वाचविण्यास यश आले होते,तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यापाठोपाठ पुन्हा एका युवकाचा गोदावरीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी (दि.१९) टाळकुटेश्वर मंदिराजवळ नदीकाठालगत मृतदेह तरंगताना आढळून आला. यावेळी गोदापुत्र जीवरक्षकांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. राकेश विनायक नेहरे (२५) असे पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा युवक सोमवारी दुपारी नदीपात्रात बुडाला होता. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: The youth drowned in Godapatra