शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'मला पाणी प्यायचे आहे, सांगून पोलिसाला दिला धक्का; चोरटा पोलीस ठाण्यातून फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 17:22 IST

या घटनेने इंदिरानगर पोलिसांसह गुन्हे शोध पथकाची धावपळ उडाली. त्याचा दिवसभर पोलिस शोध घेत होते; मात्र तो उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती लागला नाही.

संजय शहाणे, नाशिक : चोरीच्या एका गुन्ह्यात अटक केलेला संशयित आरोपी विशाल ज्ञानेश्वर तीनबोटे हा पोलिस ठाण्यातील एका पोलिसाला धक्का देत संरक्षक भिंतीवरून उडी घेऊन पळून गेला. मंगळवारी (दि. १९) सकाळी ही घटना इंदिरानगर पोलिस ठाण्यात घडली. या घटनेने इंदिरानगर पोलिसांसह गुन्हे शोध पथकाची धावपळ उडाली. त्याचा दिवसभर पोलिस शोध घेत होते; मात्र तो उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती लागला नाही. त्याच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला संशयित विशाल ज्ञानेश्वर तीनबोटे (२०,रा. म्हसोबा मंदिराजवळ साठेनगर, वडाळा गाव) यास गुन्हे शोध पथकाचे युनिट २चे उपनिरीक्षक संजय पाडवी यांच्या पथकाने ताब्यात घेतले होते. सोमवारी (दि.१८) इंदिरानगर पोलीस ठाण्यात विशाल याला आणण्यात आले. त्यानंतर गुन्हा तपास करणारे रात्रपाळीचे पोलीस हेडकॉन्स्टेबल किशोर देवरे यांनी नऊ वाजता संशयित तीनबोटे यास ताब्यात घेऊन गुन्ह्यासंदर्भात चौकशी सुरू केली.

रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्याला अटक दाखविण्यात आली. त्यानंतर त्यास अंबड पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये टाकण्यासाठीची तयारी इंदिरानगर पोलिसांनी सुरू केली होती. हे लक्षात आल्यानंतर मंगळवारी संशयित विशाल याने पोलिसांकडे पाणी पिण्याची इच्छा व्यक्त केली. त्यास देवरे यांनी पोलीस ठाण्याच्या मागील प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पाण्याच्या कुलरजवळ घेऊन गेले. देवरे हे त्याला पाणी देत असताना त्याने जोराचा धक्का त्यांना दिला. काही क्षणांत पोलीस ठाण्याच्या संरक्षक भिंतीवरून उडी घेत धूम ठाेकली. पोलिसांनी तातडीने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. इंदिरानगर पोलीस ठाण्यात देवरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे दोन पथक त्याच्या मागावर असून लवकरच त्याला ताब्यात घेण्यास यश येईल, असे पगार यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी