तोफांच्या गर्जनेने शत्रूला भरविली धडकी; नाशिकच्या देवळालीत थरार...!

By अझहर शेख | Updated: January 21, 2026 17:56 IST2026-01-21T17:55:41+5:302026-01-21T17:56:31+5:30

निमित्त होते, स्कुल ऑफ आर्टिलरीच्या वतीने बुधवारी (दि. २१) देवळाली गोळीबार मैदानात आयोजित ‘तोपची’ वार्षिक युद्धसराव प्रात्यक्षिकांचे.

The roar of cannons terrified the enemy; Thrill in the temples of Nashik...! | तोफांच्या गर्जनेने शत्रूला भरविली धडकी; नाशिकच्या देवळालीत थरार...!

तोफांच्या गर्जनेने शत्रूला भरविली धडकी; नाशिकच्या देवळालीत थरार...!

नाशिक : बोफोर्स, धनुष्य, हॉवित्झर, वज्रसह आठ तोफा अन मल्टी बॅरल रॉकेट लाँचरचा सर्वत्र प्रहारने देवळाली फायरिंग रेंज हादरली... काही सेकंदात निश्चित लक्ष्य आर्टीलरीच्या प्रशिक्षित गनरच्या चमुने तोफांच्या सह्याने अचूकरित्या भेदले अन् तोफांचा हा जोरदार मारा बघून शत्रूलाही धडकी भरली असावी. डोंगररांगांवरील ‘टार्गेट’वर बॉम्बहल्ला चढवून आर्टीलरीने आपले शक्तीप्रदर्शन केले.

निमित्त होते, स्कुल ऑफ आर्टिलरीच्या वतीने बुधवारी (दि. २१) देवळाली गोळीबार मैदानात आयोजित ‘तोपची’ वार्षिक युद्धसराव प्रात्यक्षिकांचे. या सोहळ्याला तामिळनाडू वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज चे कमांडंट लेफ्टनंट जनरल मनिष एरी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांचे स्वागत स्कुल ऑफ आर्टिलरीचे कर्नल कमांडंट अतिविशिष्ट सेवा मेडल, सेना मेडल, विशिष्ट सेवा मेडल लेफ्टनंट जनरल नवनीत सिंग सरना यांनी केले. यावेळी ‘कॅट्स चे कमांडंट मेजर जनरल अभिनय राय यांच्यासह विशेष निमंत्रित म्हणून नेपाळ आर्मी कमांड ॲन्ड स्टाफ कॉलेजचे सैनिकी अधिकारीदेखील यावेळी उपस्थित होते.

सालाबादप्रमाणे यावर्षी सकाळी दहा वाजता देवळाली फायरिंग रेंज परिसरात या प्रात्याक्षिकांचा थरार उपस्थितांनी अनुभवला. गनरच्या चमूकडून एकुण आठ तोफा, दोन रॉकेट लाँचर द्वारे अनोख्या युद्धशैलीचे शास्रशुद्ध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी उपस्थितांच्या अंगावर शहारे आले अन बॉम्बगोळ्यांच्या आवजाने कानठिळ्या बसल्या.

‘ ड्रोन’च्याही आकाशात घिरट्या 

बदलत्या काळानुरुप आधुनिक युद्धप्रणालीअंतर्गत ‘ड्रोन अटॅक’बाबतचेही प्रशिक्षण दिले जात असून ड्रोनद्वारे शत्रूच्या तळावरील रेकी असो किंवा मग हल्ला असो यासाठी भारतीय सैन्यदल सज्ज असल्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’च्यावेळी जगाने बघितले. या प्रात्याक्षिकांमध्येही वेगवेगळ्या प्रकारचे बेसिक, ॲडव्हान्स्ड अशा दहा ते बारा ड्रोनची झलक मैदानात पहावयास मिळाली.

 नौदल व ‘बीएसएफ’चा प्रथमच सहभाग 

भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी प्रथमच आर्टीलरीच्या प्रात्याक्षिकांमध्ये आपला सहभाग नोंदविला. या सैनिकांनी उखळी मारा करणाऱ्या तोफेद्वारे अचूक लक्ष्य भेदले. त्याचप्रमाणे नौदलाच्या सैनिकांनीही त्यांच्या विशिष्ट ड्रोन ऑपरेशनद्वारे पहिल्यांदाच सहभाग घेतला.

Web Title : नाशिक के देवलाली में तोपों का प्रदर्शन, दुश्मन में दहशत।

Web Summary : देवलाली फायरिंग रेंज में शक्तिशाली तोपखाने का प्रदर्शन हुआ, जिसमें विभिन्न तोपों और रॉकेट लांचर शामिल थे। वार्षिक अभ्यास के हिस्से के रूप में प्रदर्शन में सटीक निशाना, ड्रोन तकनीक और नौसेना और बीएसएफ की भागीदारी को दर्शाया गया, जो भारत की सैन्य तत्परता को उजागर करता है।

Web Title : Artillery display in Nashik's Deolali instills fear in enemy.

Web Summary : Deolali firing range witnessed a powerful artillery display, featuring various guns and rocket launchers. The demonstration, part of an annual exercise, showcased precision targeting, drone technology, and participation from the Navy and BSF, highlighting India's military readiness.