मनमाडला अतिरेकी शिरल्याची खोटी माहिती दिल्याने पोलिसांची तारांबळ

By धनंजय वाखारे | Published: March 16, 2024 10:53 AM2024-03-16T10:53:31+5:302024-03-16T10:54:28+5:30

आपत्कालीन सेवा क्रमांकाचा गैरफायदा घेणाऱ्यावर कारवाई

The police are on the alert for giving false information about the entry of militants to Manmad | मनमाडला अतिरेकी शिरल्याची खोटी माहिती दिल्याने पोलिसांची तारांबळ

मनमाडला अतिरेकी शिरल्याची खोटी माहिती दिल्याने पोलिसांची तारांबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
मनमाड : शहरात रेल्वेचे मोठे जंक्शन स्थानक, भारतीय खाद्य निगमचे गोदाम, शीख धर्मियांचे गुरुद्वारा, रेल्वे इंजिनिअरिंग कारखाना आणि शहरापासून जवळच असलेले इंधन प्रकल्प यामुळे मनमाड शहर हे नेहमीच हॉटलिस्टवर असल्याने प्रशासन देखील सदैव सतर्क असते मात्र शहरातील एका घरामध्ये जबरदस्तीने दोन आतंकवादी शिरल्याची माहिती आपत्कालीन सेवा क्रमांक ११२ वर दिल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली.संबंधित विषय शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने चर्चेला एकच उधाण आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील रेल्वे परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ५० युनिट परिसरातून शुक्रवारी सायंकाळी ५ : १५ वाजेच्या सुमारास आपत्कालीन सेवा क्रमांक ११२ वर अनेक वेळा फोन करून घरामध्ये दोन आतंकवादी शिरले आहेत तसेच मला मारहाण करून चोरी करीत आहे अशी माहिती रेल्वेच्या इलेक्ट्रिशियन विभागात काम करणाऱ्या अमोल प्रवीण वळवी (वय ४०) यांनी दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मनमाड पोलीस प्रशासनाने तत्काळ याची दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. मात्र घटनास्थळी असा कोणताही प्रकार आढळून आल्याने मनमाड पोलीस स्थानकात खोटी माहिती देणाऱ्या रेल्वे कर्मचारी अमोल प्रवीण वळवी याच्या विरोधात पोलीस कर्मचारी सोपान संजय मुंडे यांनी तक्रार दाखल केली असून भादंवि १७७ प्रमाणे कारवाई केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सरोवर करीत आहे.

Web Title: The police are on the alert for giving false information about the entry of militants to Manmad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.