शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ड्रायव्हरने ओलेक्ट्रा ईलेक्ट्रीक बस सुरु करताच मोठा आवाज झाला, थेट स्थानकात शिरली; महिलेचा मृत्यू

By अझहर शेख | Updated: December 8, 2024 09:34 IST

Olectra electric bus accident शिर्डी ते नाशिक या मार्गांवर धावणारी ई बस सुरक्षितपणे महामार्ग बस स्थानकात पोहचली.

नाशिक : शिर्डीहुन नाशिकला महामार्ग बस स्थानकात शनिवारी(दि. ७) रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास आलेली ई बस (एम.एच.०४ एलक्यु ९४६२) फलाटावर चौकशीकक्षासमोर थांबली. काही वेळेने बस थेट स्थानकात शिरली यावेळी आंध्रप्रदेशची महिला भाविक बसखाली सापडून जागीच ठार झाली. 

अंजली थट्टीकोंडा - नागार्जुन (२३,रा. पटछवा, जि. प्रकाशम, आंध्रप्रदेश) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

शिर्डी ते नाशिक या मार्गांवर धावणारी ई बस सुरक्षितपणे महामार्ग बस स्थानकात पोहचली. चालक उमेश दत्तात्रय भाबड (३२,रा. वेहळगाव,नांदगाव) यांनी बस थांबाविली.सर्व प्रवशी खाली उतरल्यानंतर तेदेखील लॉकसीट एंट्री करण्यासाठी खाली उतरले. एन्ट्री करून भाबड पुन्हा बसमध्ये चढले. यावेळी त्यांनी बस सुरू करताच मोठा आवाज झाला अन बसने अचानकपणे उसळी घेत क्षणात लोखंडी बार तोडून थेट चौकशी कक्षाच्या भिंतीवर जाऊन धडकली. कक्षाजवळ ओट्यावरून पती मुपाल्ला नागर्जून(३०, रा. कोंडीकंडुर, जि. प्रकाशम) यांच्यासोबत चालत असलेल्या अंजली यांना बसची जोरदार धडक बसली. यावेळी मुपाल्ला हे थोडक्यात बचावले. त्यांच्या हाताला दुखापत झाली. तसेच चौकशी खिडकीसमोर माहिती घेण्यास उभे असलेले गोरक्ष मछिंद्र गोसावी (५७, रा. पाथर्डीफाटा ) हे देखील बसच्या धडकेत गंभीर जखमी होऊन ओट्यावर कोसळले.

चौकशी कक्षाची एक भिंत पूर्णतः कोसळली. या दुर्घटनेने एकच खळबळ माजली. स्थानकातील कर्मचारी, अन्य बसचे चालक, वाहक यांनी धाव घेत जखमी गोसावी यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अंजली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शासकीय जिल्हा रुग्णालयात त्यांना रुग्णवाहिकेतून हलविण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. गोसावी त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले  घटनेची माहिती मिळत जवळ असलेल्या मुंबई नाका पोलिसांनी महामार्ग बस स्थानकात धाव घेऊन चालक भाबड यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :state transportएसटीAccidentअपघातelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर